ऊस वेळेत जात नसल्याने शेतकरी हतबल, शेतकर्यांचा उपोषणाचा इशारा

आष्टी/प्रतिनिधी सुधाकर जाधव
परतूर तालुक्यातील श्रद्धा एनर्जी. मॉ बागेश्वरी साखर कारखाना येथील अनागोंदी कारभारामुळे काऱ्हाळा व लिंगसा शिवारातील ऊस लागवड शेतकरी हतबल झाला आहे.कारखान्याच्या गलथान कारभाराला वैतागून शेतकरी उपोषण करण्याच्या पावित्र्यात आहे.गेल्या वर्षी डिसेंबर जानेवारी, फेबरुवारी,मार्च,2021 मध्ये खोडवा ऊसाची नोंद असून,आज रोजी त्या ऊसाला 15 ते 16 महिने झाले आहेत. परंतु कारखान्याच्या नियमानुसार तोड येऊनही कारखान्याने ऊस तोड केली नाही
        त्या संदर्भात शेतकरी यांनी कारखाना येथील कर्माचारी यांना वेळोवेळी व्यक्तिगत व सामूहिक भेट देऊन, खोडवा ऊस तोडण्याची विनंती केली. परंतु त्यांनी आमाच्या विनंतीस मान न देता उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचे काम केल्याचा आरोप शेतकरी यांनी उपविभागीय अधिकारी परतूर यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. वेळेत ऊस तोडणी न झाल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली असून,मोठे आर्थिक नुकसान झाल्याने , आत्महत्या करण्याची वेळ आम्हा शेतकऱ्यावर आली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम अंतील टप्प्यात असून,आम्ही शेतकरी हतबल झाल्याने, स्थानिक प्रशासनाने आमच्या ऊसाचा प्रश्न निकाली काढण्याची विनंती शेतकरी यांनी केली आहे. प्रशासनाने लक्ष घालून ऊसाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा नसता आम्ही काऱ्हाळा व लिंगसा शिवारातील शेतकरी येत्या 27 तारखेपासून आपल्या कार्यालयापुढे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा शालिनी सोळंके,गणेश,सोळंके, डिगांबर शेळके,शिवाजी शेळके,गोरख शेळके, जालिंदर शेळके,वामन,शेळके, विष्णू शिंदे,श्रीमंत जाधव,रमेश तांगडे, दत्ताराव दराडे, किसन गायकवाड,संदीप बोराडे, योगराज डवले,सचिन डवले,आसाराम जाधव,या शेतकरी यांनी उपविभागीय अधिकारी परतूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड