न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूलमध्ये डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
परतूर – प्रतिनिधी हनुमंत दवंडे
शहरातील न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूलमध्ये दि १४ एप्रिल २०२२ रोजी महामानव भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे गणेश सोळंके, सचिव छाया बागल, प्राचार्य सॅम वर्गीस, शिक्षक गोविंद पाठक, लीना सॅम, सुरेखा ताजी, किशोरी पाठक, मिना गोरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.