. श्री.क्षेत्र संस्थान देवमाळ आंबा- मसला येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात प्रारंभ....


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर तालुक्यातील मसला येथे अखंड हरिनाम सप्ताह आरंभ झाला असून यामध्ये काकडा, भजन, ग्रंथराज ,ज्ञानेश्वरी पारायण, व भागवत पुराण कथा, वाचन गाथा, भजन ,हरिपाठ ,रात्री नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तन प्रवचन व जागर कार्यक्रम मोठ्या उत्साहाने भाविक भक्त अखंड हरिनाम सप्ताह मध्ये तल्लीन होऊन गेलेले आहेत 
      .तसेच नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तन प्रवचन व जागर कार्यक्रम दररोज सुरू आहे. कीर्तनाचे पहिले पुष्प श्री. ह. भ .प दगडुबा महाराज दाते, कीर्तनाचे दुसरे पुष्प श्री .ह .भ. प विशारद रामेश्वर महाराज नरवडे, कीर्तनाचे तिसरे पुष्प श्री. ह .भ. प भागवताचार्य श्याम महाराज, कीर्तनाचे चौथे पुष्प श्री. ह .भ. प शिवाजी महाराज भोसले, कीर्तनाचे पाचवे पुष्प ह-भ-प शोभा ताई चव्हाण कीर्तनाचे सहावे पुष्प ह .भ. प विनोदाचार्य गणेश महाराज जाधव, कीर्तनाचे सातवें पुष्प श्री ह. भ. प भागवताचार्य चंद्रकांत गुंजकर महाराज . यांचे कीर्तन रुपी सेवा असणार आहे. सात दिवस पण तिचे यजमान श्री .वैजनाथ राव माने आंबा, श्री .रमेश गोरे परतुर, श्री. पंडितराव शेंडगे मापेगाव, अनिल राव काळे हातडी, श्री. कृष्णा महाराज आंबा, श्री. रावसाहेब मुजमुले आंबा, श्री सीताराम गोरे परतुर, संस्थान देव मसला या अखंड हरिनाम हे असणार आहेत. सप्ताहाची सांगता दिनांक 29 /4 /2022 वार शुक्रवार रोजी श्री. ह .भ .प. लक्ष्मण महाराज पाटील आळंदीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे तरी या अखंड हरिनाम सप्ताह याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा. असे आव्हान मसला येथील वारकरी संप्रदायाने केले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत