जारचे पाणी ; गंदा है पर ठंडा है यह------------------ अशुद्ध पाणी ग्राहकांच्या माथी : पाण्याच्या गोरखधंद्याला आळा घालण्याची गरज---------------------------------------------


मंठा प्रतिनिधी  सुभाष वायाळ
 मंठा शहरासह ग्रामीण भागातही मिनरल वॉटरच्या नावाखाली अशुद्ध पण ; थंडपाणी विक्रीचा गोरखधंदा चांगलाच फोफावला आहे.यावर प्रशासनाचेही नियंत्रण नसल्याने पाण्याचे जार विक्रीची गल्लीबोळात दुकानदारी थाटण्यात आली आहे. कमी खर्चात,कमी जागेत चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून आता पाणी विक्रीकडे बघितल्या जात आहे. सुरुवातीला शुद्धीकरणाचे प्लान्ट टाकून मिनरल वॉटरचे जार विकणारे मोजकेच व्यावसायिक होते.परंतु, भूगर्भातील पाणी उपसून केवळ थंड करुन विकण्याला जास्त खर्च लागत नसल्याने आता पाणी विक्रीचा व्यवसाय शहरासह ग्रामीण भागात गल्लोगल्ली पहावयास मिळतो.यात पाण्याच्या शुद्धीबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही. 
      बोअरवेलद्वारे आलेले पाणी मशिनद्वारे थंड करून जारमध्ये भरले जाते. तो जार सध्या तीस ते चाळीस रुपयात विकल्या जात आहे. नागरिकही दिवसेंदिवस या थंड पाण्याची मागणी करीत असल्याने पाणी विक्री जोरात आहे. विशेषत: विविध कार्यक्रम, सोहळे, विवाह समारंभ व इतर सार्वजनिक उत्सवासह शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि दुकानांमध्येही आता जारमधील थंड पाणी वापरले जात असल्याने पाणी विक्रेत्यांची चांदीच आहे.मिनरल वॉटरच्या नावे केवळ अशुद्ध आणि थंड पाणीच पुरविल्या जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन या पाणीव्यवसायाला आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.पाणी विक्रेते घेताहेत नियमांच्या अभावाचा आडोसाकोणताही व्यवसाय सुरु करण्याकरिता विविध विभागांच्या 
सोबतच व्यवसायाचा परवानाही लागतो. परंतु पाण्याचे जार विकणाऱ्यांकरिता प्रशासनाची कोणतीही नियमावली नसल्याने पाणी व्यावसायिकांचे फावते आहे. मिनरल वॉटरच्या नावाने जारला केवळ लेबल लावून पाण्याची विक्री होत आहे. याकरिता व्यावसायीक कर तसेच व्यावसायिक महावितरणचे मीटर घेणे बंधनकारक आहे. पण, त्यालाही बगल दिल्याने या संदर्भात कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.दुसऱ्या,तिसºया दिवशी बदलते पाण्याची चवथंड पाण्याच्या हव्यासापोटी चव नसली तरीही नागरिकांकडून पाण्याची मागणी होत आहे. या पाण्याची दुसºया व तिसऱ्या दिवशी या पाण्याची चव आपोआप बदलत असल्याने या पाण्याची शुद्धी व गुणवत्ता लक्षात येते. या गुणवत्ते संदर्भात जारवर कोणतीही माहिती नमूद केलेली नाही. त्यामुळे आता जारच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी पाणी वापरणाऱ्यावर आहे. अन्यथा हेच पाणी नागरिकांना दुर्धर आजाराचे गिफ्ट दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पाणी विके्रत्यांच्या भरवशावर आपले आरोग्य सुरक्षित समजणे मोठी चूक ठरू शकते. म्हणून नागरिकांनी आता सजग राहून पाऊल उचलायला हवे.त्यांना कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव विचाराधीन आहे. नागरिकांनी गुणवत्तेबाबत जागरुक रहायला हवे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती