इमर्जन्सी लोडशेडिंग च्या नावाखाली जनतेचा छळ वीजवितरणने थांबवावा-संपत टकले,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरण ला भाजपाचे निवेदन

प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली वीज वितरण कंपनीने जनतेचा छळ चालवला असून रात्री-बेरात्री केव्हाही लाईट घालवण्याचे पाप वीज वितरण करीत असून श्रीष्टी सर्कल मध्ये एक दिवस आड विद्युत पुरवठा केला जात असल्याने नागरिकांसह शेतकरी हवालदिल झाला असून बागायती क्षेत्राला या वीज वितरण च्या गलथान कारभाराचा फटका बसत असल्याचे युवा मोर्चा जिल्हा महामंत्री संपत टकले संपत टकले यांनी म्हटले आहे
आज भाजपा च्या वतीने इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली चालवलेला सावळागोंधळ थांबवावा यासाठी उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले यावेळी ते बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की वीज वितरण कंपनीने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा छळ न थांबवल्यास आमचे सर्वोच्च नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संपत टकले यांनी यावेळी वीज वितरण ला दिला
पुढे बोलताना संपत टकले म्हणाले की राज्यातील आघाडी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचे पाप करू नये उन्हाळ्याच्या दिवसात इमर्जन्सी च्या नावाखाली दोन दोन दिवस वीज गायब असते अशा परिस्थितीमध्ये जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसून अनेकांना आपल्या पिकांना पाणी देता येत नाही आबालवृद्ध यांना रात्रीच्या गर्मीचा त्रास सहन होत नाही अशा परिस्थितीत वीज वितरण तुघलकी भूमिका घेत असून यामुळे सर्वसामान्य जनता छळली जात असल्याचा आरोप या वेळी टकले यांनी केला
या वेळी यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भगवानराव मोरे दया काटे ओमप्रकाश मोर श्रीरंगराव जईद दिनेश शेठ होलानी नगरसेवक संदीप बाहेकर नगरसेवक प्रकाश चव्हाण नगरसेवक कृष्णा आरगडे राजेंद्र मुंदडा जगन्नाथ सोनखेडकर, शिवाजी बल्लमखाणे बळीराम हिवाळे प्रमोद राठोड मुज्जू कायमखानी मलिक कुरेशी नंदकिशोर मुंदडा आनंद कोटेचा जगदीश झंवर ओमप्रकाश राठी श्यामसुंदर चितोडा नरेश कांबळे राजेश म्हस्के अमर बगडीया संतोष काळे अमोल हरजुळे, भास्कर काळे दीपक कुरे विष्णू मचाले लालचंद मालपाणी सौरभ बागडीया यांच्यासह शेकडो कार्यकर्यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश