महावितरणच्या नाकावर टिच्चुन खाजगी एजन्सीकडुन बोगस आयटीआयधारकांना नियुक्त्यामहावितरण उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
   परतुर शहरातील महावितरण विभागामार्फत नेमून दिलेले खाजगी एजन्सीने बाह्यस्त्रोत यंत्रचालक व बायस्रोत जनमित्र यांची एजन्सीने मनमानी पद्धतीने आयटीआयचे खोटे बनावट प्रमाणपत्र आणून आर्थिक देवाण-घेवाणीतुन नियुक्त्या देऊन नोकऱ्या करीत आहेत. दरम्यान नियमित शासकीय आयटीआय पास बेरोजगार विद्यार्थी यांना डावलण्यात आले आहे.
      आम्ही नियमित दोन वर्षे पूर्ण अभ्यास करून आमचे शिक्षण पूर्ण केले असुन या नियुक्ती दरम्यान आमचा कसलाही विचार केला नसल्याचा आरोप महावितरण विभागाला दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. आम्ही आपल्या मंडळ कार्यालयामध्ये कोणी बाह्यस्रोत यंत्रचालक म्हणून तर कोणी लाईनमन म्हणून काम केलेले आहे. आमचा त्या संबंधित कामाचा अनुभव आहे. तरी आम्हाला वरील पदासाठी डावलून आर्थिक देवाण-घेवाण करून आयटीआयचे खोटी प्रमाणपत्र घेऊन नियुक्त्या दिल्या आहेत. आपण नेमून दिलेल्या एजन्सीने शासकीय आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यावर अन्याय केला आहे. येणाऱ्या ई टेंडर मधील एजन्सीला नियमित आयटीआय शासकीय आर्हता धारक लोकांना घेण्यात यावे. आमच्या वरील अन्याय दूर करावा. वरील आयटीआय खोटी प्रमाणपत्रची आणि कागदपत्रे पडताळणी करण्यात यावी. व त्यांना कामावरून कमी करण्यात यावे. जेव्हा टेंडर होईल त्या वेळी संबंधित एजन्सीला शासकीय नियमात आयटीआय आर्हता उमेदवारांना नियुक्त्या देण्यात याव्यात, असे आदेशीत करावे. आमच्या वरील अन्याय दूर करावा. नसता येणाऱ्या काळात आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आम्ही उपोषण आंदोलन करू,असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर शेख उस्मान, देविदास खालापूरे, विशाल एकेवार, दिपक मोरे, रमेश चव्हाण, अतिष सवणे, विशाल चव्हाण, सचिन सरकटे, दिपक शिलवंत, दिपक राऊत सह आदी विद्यार्थ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

तळणी : येथील कुस्ती स्पर्धला मोठा प्रतिसाद नववर्षाच्या दिवशी लाखो रुपयाची उधळण