हेलस येथे श्रीराम मंदिर कलश रोहण सोहळा उत्साहात संपन्नमंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ 
     -दि..०८तालुक्यातील हेलस गावाची एक अनोखी ओळख आहे येथील पुरातन हेमाडपंथी व प्राचीन कलाकृती असलेले महादेव मंदिर, कालिंका देवी मंदिर, गणपती मंदिर व तसेच श्री दत्त मंदिर या सर्व मंदिरांची बांधकाम आणि कलाकृती बघून मन हरकून जाते तसेच हेलस या गावातील सर्व गावकरी आपली संस्कृती जपत दरवर्षी श्री गणेश उत्सव साजरा करतात गेल्या कित्येक वर्षांपासून चालत असलेलं एक गाव एक गणपती ही परंपरा अजूनही या गावात शांततेत पार पडत असते गावाच्या परिसरात बारा हनुमान मंदिरे असून प्राचीन वास्तू, परंपरा, धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवा साठी ओळखले जाणारे हे गाव आहे तसेच या गावाच्या बाहेर उत्तरेला काही अंतरावर बऱ्याच वर्षांपूर्वी एक महिला शेतात जात असतांना तिला जमिनीतून काहीतरी आवाज आल्याचं जाणवलं त्यानंतर त्या महिलेने तिथे खोदल असता जमिनीच्या आतून श्रीराम, लक्ष्मण, आणि सीता या तीन मूर्ती आढळून आल्या असे गावातील लोक सांगतात तेव्हा पासून गावाकऱ्यांनी एक छोटं मंदिर बांधून तिथे श्रीरामाच्या मंदिराची स्थापना केली होती पण काळानुसार ते मंदिर खूप जुनं झाल्यामुळे गावाकऱ्यांनी नवीन व भव्य असे श्रीरामाचंद्र प्रभूचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेतले काही वर्षापासून चालत असलेल्या ५१ फूट उंची असेलेलं मंदिर बांधून पूर्ण झाले व दि.७/४/२०२२ गुरुवार रोजी या मंदिराचा भव्य कलश रोहणाचा व श्री राम,लक्ष्मण, सीता आणि हनुमानच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठाचा कार्येक्रम पार पडला या कर्यक्रमाच्या निमित्ताने गावातून मूर्तिची भव्य मिरवणूक काढली व नंतर श्रीरामाच्या मंदिरापाशी महापूजा करून मंदिरावर कळस लावण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला यावेळी गावातील व पंचक्रोशीतील सर्व भाविक फक्त उपस्थित होते.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी