29 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनास जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार


जालना प्रतिनीधी समाधान खरात
 अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 29 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन 28 व 29 मे 2022रोजी मंठा या ठिकाणी सुप्रसिद्ध साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे, विजय घोगरे हे स्वागताध्यक्ष पद भूषिवणार आहेत या साहित्य संमेलनास मोठया संख्येने साहित्यिक उपस्थित राहणार आहेत, या संमेलनास जालन्याचे जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यांना आज साहित्य साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निमंत्रण दिले या वेळी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे,महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अनिल खंदारे,औरंगाबाद विभागीय अध्यक्ष भरत मानकर, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष अशोक कुरूंद आदीजण उपस्थित होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड