अक्षय्य तृतिया व ईद पूर्वी कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना मिळाले धनादेश,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते 30 लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण

प्रतिनधी/हनुमंत दवंडे
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील परतूर तालुक्यातील लाभार्थ्यांना} रुपयांचे धनादेशाचे वितरण तहसील कार्यालय परतूर येथे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते अक्षयतृतीया व रमजान ईद च्या अगोदर दिनांक 30 एप्रिल रोजी करण्यात आल्याने लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे
यावेळी माजी मंत्री आमदार लोणीकर यांनी सांगितले की आपणास मिळणारी ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याचे आपणास जाणीव असून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ही मदत आपणास दिली जात असून
निश्चित पणाने आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैवी घटना घडल्या आहेत मात्र आपण प्रत्येक बाबतीत आपल्या पाठीशी खंबीर असून आपणास आज अक्षय तृतीया व ईद पूर्वी ही मदत मिळत असल्याने आपण समाधानी असल्याचे आमदार लोणीकर यांनी यावेळी सांगितले
यावेळी उपविभागीय अधिकारी श्री जाधव साहेब. तहसीलदार चित्रक मॅडम पद्माकर कवडे संबंधित विभागातील नायब तहसीलदार धुमाळ साहेब. कुलकर्णी साहेब. शिंगाडे साहेब. माजी सभापती रंगनाथ येवली. भगवानराव मोरे रमेशराव भापकर दया काटे ओम प्रकाश मोर तुकाराम सोळंके छत्रगुन कणसे कृष्णा अरगडे सिद्धेश्वर सोळंके रवी सोळंके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थी नंदाबाई रंगनाथ भदर्गे, रेणुका प्रकाश गाडे, अलका सुखदेव शेळके, निलाबाई परसराम जाधव कृशीवर्ता बाबुराव बागल, कलावती भिमराव आडे ताराबाई सुरेश तांगडे संदीप रुस्तुम लोखंडे दादाराव तुळशीराम टोणपे जयनाबी नादान सय्यद संगीता तात्याराव लाटे आशामती दत्ता कवडे मालन विठ्ठलराव कवडे शालिनी छगन काटकर कुशवार्ता मनोहर गायकवाड रामकोर कुंडलिक तौर, कालींदा दत्ता काटे मालन बापूराव निर्वळ तारामती सुभाष अंभोरे चंद्रकला प्रकाश हिवाळे मीरा मदन दांगट रेवताबाई देविदास सोळंके रेहान बी सज्जन शेख हौसाबाई भागाराव साळवे आशामती रामराव तांबडे नंदा काशिनाथ पहाडे मीरा जनार्दन उबाळे शेख गोसिया बी इफतेकार इसा उस्मान सय्यद आसाराम भीमराव गलबे आदींना प्रत्येकी वीस हजार रुपयाचे धनादेश माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले