राज्य शासनाकडून धनगर समाजावर अन्याय- हनुमंत दवंडे मौर्य क्रांती संघ तालुका अध्यक्ष


जालना प्रतिनिधी/समाधान खरात
 महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये विविध विकास महामंडळासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्रात दोन नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला वगळण्यात आले आहे. मेंढ पाळा साठी असणारे अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळास कसलाही निधी दिला नाही.
             यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजावर अन्याय करण्यात आला आहे. असा आरोप मौर्य क्रांती संघाचे तालुका अध्यक्ष हनुमंत द वंडे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील महामंडळांना भरीव निधी देण्याचा ठराव करण्यात आला असून त्यामध्ये महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ 500 कोटी, वरून 1000 कोटी ,संत रोहीदास उद्योग व चर्मकार विकास महामंडळ 73 कोटी वरून 1000 कोटी,धनगर समाज हा दोननंबर वर असलेला व अति मागास असलेल्या धनगर समाजाला यातून वगळण्यात आले आहे. धनगर समाजाची गेली कित्येक वर्षापासून एसटी आरक्षण देण्याबाबतची मागणी सर्वच राजकीय पक्षानी कायमस्वरूपी बाजूला ठेवली आहे. धनगर समाजावर अन्याय करत आहात मेंढपाळ वरती दररोज अन्याय होत असून साधी त्यांची दखल घेतली जात नाही .डोंगरी भागात राहणाऱ्या समाज बांधवांना सातत्याने वनविभागाच्या त्रासाला तोंड द्यावे लागत असते. धनगर समाजाला का या सर्व च प्रक्रियेतून जाणून-बुजून वंचित ठेवण्यात आले. धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवायचा वापरा आणि फेका आणि हीच नीती सर्वच राजकीय पक्षाची दिसून येतं आहे. महाराष्ट्रातील सर्व मंत्री आमदार खासदार यांनी धनगर समाजाच्या मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मौर्य क्रांती संघाचे परतुर तालुका अध्यक्ष हनुमंत दवंडे म्हणाले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड