सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

धर्मवीर शंभुराजे बहुउद्देशींय संस्थेच्यावतिने रक्तदान शिबिर संपन्न


मंठा प्रतिनिधी  पप्पू घनवट
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने दिनांक १४ मे शनिवार रोजी धर्मवीर शंभु राजे बहुउद्देशींय सेवाभावी संस्थेच्यावतिने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात 44 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 
  या शिबिराच्या सुरूवातीस संस्थेचे सचिव बाजीराव बोराडे,व पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष रंजित दादा बोराडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी धर्मवीर शंभु राजे बहुउद्देशींय सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष डिगांबर बोराडे,उपाध्यक्ष भागवत चव्हाण, सचिव बाजीराव बोराडे,कृष्णा खरात, गजानन बोराडे,संतोष बोराडे,विजय बोराडे,आकाश गिरी,विष्णु बहाड, वैभव शहाणे,किरण बोराडे,आकाश कास्तोडे,योगेश बोराडे,ज्ञानेश्वर वायाळ, संदिप बोराडे,बाळु गवळी, मोहन बोराडे,प्रल्हाद बोराडे,वझीर पठाण,सोनु काका,अमोल लोखंडे, मोसीन कुरेशी,भारत काळे,दत्ता घुगे, संदिप वायाळ,राहुल पाटील,सुरेश बाहेकर,गणेश पोटे,कैलास बोकाडे, सिद्धेश्वर भगस यांच्यासह लोकमान्य बल्डबॅकेचे डाॅ.राजाभाऊ चव्हाण
केशवराव वाघ,गणेश ठाकरे यांच्यासह 
पदाधिकारी व शिव-शंभो भक्त उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत