ट्रान्सफार्मर मिळेना अखेर शेतकऱ्याने... टोकाचे पाऊल उचलले..


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही ट्रान्सफार्मर मिळत नसल्याने शेतकरी थेट महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्याच्या दालनात गेला. सोबत आणलेली किटकनाशकाची बाटली काढली आणि विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने अधीक्षक अभियंत्याच्या दालनात बसलेल्या ईतर अधिकाऱ्यांनी ही बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. जालन्यातील महावितरणच्या कन्हैयानगर भागातील कार्यालयात मंगळवारी (17 मे) दुपारी ही घटना घडली
महादेव चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव असून ते परतूर तालुक्यातील चिंचोली येथील रहिवाशी आहे. चव्हाण यांची चिंचोली शिवारात शेती आहे. त्यांनी 2 एकर ऊसाची लागवड केली होती. मात्र, वीजेअभावी ऊसाला पाणी देता येत नसल्याने त्यांचा 2 एकर ऊस करपून गेला. आपल्याला नवीन ट्रान्सफार्मर मिळेल या आशेने त्यांनी आजवर महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिंजवले मात्र त्यांना ट्रान्सफार्मर मिळाला नाही.
धक्कादायक बाब म्हणजे, चव्हाण यांच्या शेतालगत अगोदर ट्रान्सफार्मर होता. हा ट्रान्सफार्मर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी इतरत्र हलवला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, महावितरण कार्यालयात वारंवार चकरा मारून सुद्धा आपल्याला ट्रान्सफार्मर मिळत नसल्याने चव्हाण हे मंगळवारी महावितरण अधीक्षक अभियंत्याच्या दालनात आले. यावेळी त्यांनी सोबत किटकनाशकाची बाटली आणली होती.
किटकनाशक प्राशन करण्यासाठी चव्हाण यांनी बाटली बाहेर काढली. त्याचवेळी अधीक्षक अभियंत्याच्या दालनात बसलेल्या इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या हातातून ही बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर बदलून देण्यास टाळाटाळ करत असल्याने जगावं की मरावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड