मंठा येथे होणाऱ्या अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाच्या निमंत्रक पदी ए.जे. पाटील बोराडे


मंठा प्रतीनिधी सुभाष वायाळ
      अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दिनांक 28 व 29 मे रोजी अखिल भारतीय मराठी नवोदित साहित्य संमेलन जालना जिल्हयातील मंठा शहरातील गणेश मंगल कार्यालय लॉन उस्वद रोड मंठा येथे होणार आहे. या संमेलनाच्या निमंत्रक पदी ऐ. जे.पाटील बोराडे यांची निवड करण्यात आली. या निवडी नंतर मंठा येथील शासकीय विश्राम गृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोराडे यांनी संमेलनात जास्तीत जास्त लोकांनी या संमेलनात सहभाग नोंदवावा असे आव्हान श्री बोराडे यांनी केले आहे, 

  अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने 1993 पासून आज पर्यंत वेगवेगळी 116 संमेलन घेतली आहेत. यामध्ये अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. मंठा येथे 28 व 29 मे2022 रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे तर स्वागताध्यक्ष इंजि.विजय घोगरे भूषिवणार आहेत, 
29 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आहे. या संमेलनात राज्यभरातून जवळपास 400 साहित्यिकांनी संमेलनात आपली नोंदणी केली आहे. हे संमेलन मंठा सारख्या ग्रामीण भागात होत असल्यामुळे हि मंठा शहरासाठी भूषणीय आणी अभिमानाची बाब आहे. तरी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार होण्यासाठी आपण सर्वांनी या दोन दिवस आपला सहभाग नोंदवावा, विविध कला पथक व लोककलारांनी भजनी मंडळ यांनी ग्रंथदिंडी मध्ये आपला सहभाग नोंदवावा अधिक माहिती साठी 9803980999/ 9423156173 या नंबर वर संपर्क साधावा,
  या वेळी पत्रकार परिषदेला महाराष्ट्र कार्याध्यक्ष अनिल खंदारे, प्रा. प्रदीप देशमुख, प्रा. डॉ. सदाशिव कमळकर, तुळशीराम कुहिरे, श्रीरंग खरात, सतिष खरात, के.जि. राठोड, गौतम वाव्हल, भारत केंधळे यांच्या सह आदी उपस्थित होते

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी