तळणी येथे गेल्या ६९ वर्षापासुन अंखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन ,सप्ताहाची सांगता सेवाधारी पौळ बाबा यांच्या काल्याच्या किर्तनाने

तळणी प्रतिनीधी रवी पाटील
तळणी येथील श्री संत नेमिनाथ महाराज याच्या ६९व्या पूण्य निमित्य चालू असलेल्या अंखड हरिनाम सप्ताहची सांगता सेवाधारी पौळ बाबा यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली ( गोकूळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदाघरी आंनदल्या नरनारी ) या अंभ गावर काल्याचे किर्तन केले हा काला फक्त भूतलावर भारतात आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यामुळेच या भूमीवर नामस्मरणाचे अध्यात्माचे पेव आहे भक्ती ही निस्वार्थ असावी त्यामध्ये कुठलाच स्वार्थ नसू नाही गवळणीची भक्ती जशी भगवान श्रीकृष्णावर होती त्यामुळे परमात्मा त्याच्या हाकेला धावून जात सत्य युगातील राजा हरिश्चद्राची साठ हजार वर्षाची तपश्चर्या केली तेव्हा देव भेटला त्या साठी त्याग निष्ठा व समर्पण व ईच्छा शक्ती असणे गरजेचे आहे आजच्या युगातील भक्ती ही नाटकी व स्वार्थी आहे मनुष्यावर संकट आली की तो भंगवंताचा धावा करू लागतो ईतका स्वार्थी मनुष्य झाला आहे  
 काला हा मानवी जीवनासाठी एक अमृतच आहे जो काला घेण्यासाठी भंगवंताला मश्य अवतार घ्यावा लागला तरी सुध्दा तो भंगवंताला मिळाला नाही ब्रम्हदेवाला न मिळालेला काला तुम्हा आम्हाला मिळतो आहे त्याचे महत्व समजले पाहीजे आज काल धार्मीक सोहळा म्हंटल की काहीच्या पोटात दुखतय पण त्यासाठी तो समर्थ आहे नामस्मरणच मानवी जीवनात तारु शकते नामाने वासना क्षीण होत जातात हा तर अनुभव आहे हे जरी खरी असले तरी देह सोडण्याच्या समयी नामाखेरीज कशाचेही स्मरण राहू नये बायको आजारी पडली तर राञ दिवस जागतो आणि स्वःत ला विसरतो मग भगांवतांकरिता नाही का तसे येणार नामस्मरणाची तळमळ असली पाहीजे मग सर्व काही होते ज्या क्षणी भंगवत स्मरणात स्वःताला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल त्यासाठी साधना आणि त्याग या दोन गोष्टी करणे गरजेच आहे स्वःतला विसरणे म्णजे निर्गुणात जाणे चागले कार्य सुध्दा बंधनांला कारणीभूत होत असते 
याकरिता कोणतेही कृत्य भंगवंताला स्मरुण केले पाहीजे जो काळ भगवताच्या स्मरमामध्ये जातो तोच काळ सुखात जातो विषयासाठी आपण स्वतःला विसरतो मग भंगांवताला आठवण्यात का नाही स्वःत ला विसरू ही प्रवृत्ती ज्या वेळेस मनुष्याची होईल त्या वेळी त्याला भंगांवंताची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही 
श्रीकृष्ण परमात्माचे गाईवर नितांत प्रेम होते परतू आज त्याच गाईचा छळ होतोय धर्मावर आलेले ते एक प्रकारचे संकटच आहे प्रत्येकाकडे एक तरी गाय असावी तिची सेवा केल्यास भंगवतांच्या सेवेचे समाधान लाभत्ते पाश्चीमात्य संस्कृतीचा शिरकाव धर्मासाठी हानीकारक आहे तो वेळीच दाबल्या गेला पाहीजे तरुण मुंलामध्ये दारु पिऊन नाचण्याचे प्रमाण वाढले आहे दारू पिऊन नाचण्यापेक्षा काल्याच्या किर्तनात येवून नाचा भगवंत नक्कीच आशीर्वाद देईल आई वडीलांची सेवा करा निर्व्यसनी नामस्मरण करा तरच या कलयुगात तुमचा टिकाव लागेल नसता नरक यातना भोगण्यास तयार रहा आपली सस्कृंती खूप चांगली आहे ती टिकली पाहीजे ती टिकली तरच आपण टिकू असे प्रतिपादन सेवाधारी पौळ बाबा यांनी केले आहे 
      सद्यस्थितीत मनुष्य जीवनास तरायचे असेल तर रामकृष्ण हरी मंञ हा सदैव स्मृतीत ठेवा तो मंञाचे मनुष्याने सतत नामस्मरण केले तर तुम्हाला आयुष्यात कमी पडणार जो मनुष्य ब्रम्हांडाच्या मालकाचे स्मरण करतो त्याला कुठल्याच गोष्टी कमतरता पडणार नाही मनुष्यानी संतांनी घालून दीलेल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे 
           श्रीकृष्णाने बालपणा पासून आपल्या विविध तिला दाखवल्या राक्षसी प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठीच श्रीकृष्णाचा अवतार झाला आहे जेव्हा जेव्हा धर्मावर आघात झाला तेव्हा तेव्हा भगवतांने जन्म घेऊन राक्षसी प्रवतीचा नाश केला आहे नामस्मरणच मनुष्य जीवनाचे सार्थक करू शकतो त्याचा हट्टहास मनुष्याने धरला पाहीजे 
           मनुष्याला हा जन्म परत परत मिळणार नाही लक्ष चौऱ्याशीचा फेरा गाठून आपल्याला हा जन्म भगवंताने दीला त्याला स्मरा त्याला विसरू नका मनुष्याने लागेल तेवढेच स्वीकारले पाहीजे तेच त्याच्या हिताचे आहे 
            तळणी येथे गेल्या ६९ वर्षापासुन या अंखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन गावकर्याकडून करण्यात येते पंचक्रोशीतील प्रसीध्द संत श्री नेमिनाथ महाराज यांच्या अनेक लीला वयोवृध्दाकडून ऐकण्यास आज ही मिळतात काल्याच्या किर्तनां नंतर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले