मनसेचे सिध्देश्वर काकडे यांना पोलीसांची नोटीस'
जालना जिल्हा प्रतीनीधी समाधान खरात
मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे दिनांक १ मे २०२२ रोजी जाहीर सभा घेऊन ठाकरे शैलीत सरकारला दिनांक ४ मे पर्यंत मशीदीवरील भोंगे काढण्यासाठी मुदत दिली आहे. याच पाश्वर्भुमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आता मशीदीवरील भोंगे काढण्यासाठी आक्रमक भुमीका घेण्यासाठी हालचाली सुरु आसतांना पोलीसांकडुन सक्रीय पदाधिकार्यांसह मुख्य पदाधिकारी यांना १४९ अन्वये नोटीस जारी करुन शांतता बाळगण्यासाठी आहवान करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारीणी सदस्य सिध्देश्वर काकडे यांना देखील सेवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद ऊबाळे यांनी लेखी नोटीस देऊन शांतता बाळगण्याचे आहवान केले आहे. मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा ऊचलुन धरत राजकीय वातावरणात मनसेचं एक हिंदुत्ववादी स्थान निर्माण केल्याने मशीदीवरील भोंग्यांचा मुद्दा आता राज्यासह देशभर गाजतांना दिसत आहे. ४ में पर्यंत मशीदीवरील भोंगे न काढल्यास मनसेच्या स्टाईलने सरकारला ऊत्तर देऊ असंही सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे.