१० हजाराची लाच घेतांना कंत्राटी संगणक परिचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
दि.२४ रजिस्ट्री केल्याचा टेबल खर्च म्हणून दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना मंठा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कंत्राटी संगणक परिचालक आस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी ता.२३रोजी रंगेहात पकडले. संदीप प्रभाकर जायभाये असे या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नाव आहे.
    याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांनी ब्रह्मनाथ तांडा येथील प्लॉट खरेदी केला होता या प्लॉटची रजिस्ट्री १९ मे रोजी तक्रारदार यांनी दुय्यम निबंधक कार्यालय मंठा येथे जाऊन केली,परंतु रजिस्ट्रीचे कागदपत्र संदीप जायभाये यांनी स्वतःकडे ठेवून घेतली व तसेच त्यांनी करण्यासाठी लागलेला टेबल खर्च म्हणून तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली. 
     या तक्रारीवरून २३ मे रोजी लाच मागणीसाठी मागणीबाबत पडताळणी केली असता संदीप जायभाये यांनी तक्रारदार यांच्याकडे रजिस्ट्री करण्यासाठी लागलेल्या टेबल खर्च म्हणून दहा हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वतः स्वीकारणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सोमवारी मंठा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून संदीप जायभाये यास तक्रारदार यांच्या कडून दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना रंगे हात पकडले. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे पोलीस उपअधिक्षक सुदाम पाचोरकर , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. एस. शेख,अंमलदार ज्ञानदेव जुंबड, जावेद शेख, गणेश बुजाडे, शिवाजी जमथडे, गजानन कांबळे, व चालक प्रविण खंदारे यांनी पार पाडली.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.