ग्रामीण भागातील प्रत्येक रस्ता महामार्गाला जोडणारा - खासदार संजय जाधव

 
 परतूर /( प्रतिनिधी) हनुमंत दवंडे
 प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रोहीना ते वरफळ मजबुतीकरण व डांबरीकरण रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी खासदार संजय जाधव रोहीणा येथे बोलत होते. 
      त्यांनी सांगितले की, मतदार संघातील ग्रामीण भाग असो वा शहरी प्रत्येक रस्ता हा मुख्य महामार्गाशी जोडला जाणार असून यासाठी शिवसेना सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र शासनाने चालू केलेली मातोश्री पांदन रस्ता योजने अंतर्गत मतदारसंघात विविध गावातील पांदण रस्ते मंजूर झाले असून कामे सुरूही झाले आहेत. शिवसेनेने कोरोना काळात विविध उपक्रम राबवलेले आहेत तसेच येणाऱ्या काळातील शिवसेना मतदार संघातील विकास कामाकरिता निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही खासदार जाधव यांनी ठणकाहुन सांगितले. रोहीणा ते वरफळ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण लांबी ५.२० कीमी निविदा किमंत रु- ३०६.१५ , प्रजिमा -३६ शेलगाव अंगलगाव ते सातोना (खू) लांबी ४.२५ कीमी निविदा किमंत -२४८.६८ लक्ष रुपये व रामा २२३ येणोरा ते माव पाटोदा राममा -५४८ (c) लांबी -५ किमी निविदा किमंत रू.२४४.४० लक्ष रुपयाचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या उद्घाटना वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे, उपजिल्हाप्रमुख माधवराव मामा कदम, ज्येष्ठ शिवसैनिक रामेश्वर अण्णा नळगे, माजी सभापती संतोष वरकड,तालुकाप्रमुख अशोकराव आघाव, युवा सेना तालुका प्रमुख अजय कदम, महेश भैया नळगे ,उपतालुका प्रमुख रामचंद्र काळे ,उपतालुकाप्रमुख सुदर्शन बाप्पा सोळंके, गणेश नळगे ,दीपक कदम, दलित आघाडी तालुकाप्रमुख मधुकर पाईकराव, शहर प्रमुख दत्ता पाटील सुरुंग, शहर प्रमुख विदुर जईद, शिवा पवार, बाळू गाते, अशोक लोखंडे, अजय काकडे ,संतोष काळे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.