अखिल भारतीय गंधर्व मंडळच्या गायन परीक्षेतपरतूरच्या सप्तसुर संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश



परतूर: प्रतिनिधी हनुमंत दवंडे
अखिल भारतीय गांधर्व मंडळ तर्फे डिसेंबर 2021 या सत्रात घेण्यात आलेल्या प्रारंभिक ते संगीत विशारद गायन परीक्षेत परतूर येथील सप्तसुर संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. 
गतवर्षी प्रमाणे या वर्षीही विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. यामध्ये अर्जुन यादव (पखवाज वादन) रितेश पुरी, भक्ती सोमाणी, सानिका दडमल, गौरी हारकळ, आदित्री आकात, अपर्णा कादे, अनन्या जेवुघाले, सर्वज्ञ खरात,आर्या कुलकर्णी, अपूर्वा चिंचाने यांनी गायन विषयात विशेष योग्यता प्रविण्यासह तर योगिता माने, श्रुतिका जगताप, आज्ञा बाहेकर, आदित्य ढेरे, प्रणव काकडे, राजनंदिनी शिंदे, अथर्व लिंबूळकर, कल्याणी ढेरे हे गायन विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे संचालक प्रा. सोपान सांगुळे सर, प्रा.अनंत मगर, डॉ एस जी बाहेकर, नगरसेवक संदीप दादा बाहेकर, प्रा डॉ प्रसाद चौधरी सर, विजयकुमार बांडगे, उद्धव माने, डॉ प्रमोद आकात, राजकुमार यादव, प्रा डॉ वामनराव वैद्य सर, सुनील खरात सर, रामेश्वर नरवडे, महादेव लालझरे व सर्व पालक यांनी अभिनंदन केले..

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड