जालना पोलीस अधीक्षक पदी अक्षय शिंदे यांची वर्णी..


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
जालना पोलिस अधीक्षक पदासाठी गेल्या दीड महिन्यापासून रस्सीखेच सुरू होती. ८ जून रोजी गृह विभागाने आदेश आहेत . अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख , एसपी हर्ष पोद्दार , एसपी आर . रागसुधा यांच्याकडे काही दिवस जिल्ह्याचा पदभार होता. दरम्यान , बुधवारी गृह विभागाने अक्षय शिंदे यांची पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाल्याचे काढले असून आदेश जारी केले आहेत. पोलिस अधीक्षकपदी अक्षय शिंदे यांची वर्णी लागली आहे.
निवडणुका असल्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी असणार व आहे . गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोऱ्या – घरफोड्या क लूटमारीचे प्रमाणही वाढले आहे. मागील दीड महिन्यापासून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे जालन्याचा पदभार दिला गेला होता . अक्षय शिंदे यांचे नाव पहिल्यापासूनच चर्चेत होते. बुधवारी याबाबत आदेश निघाले वाढती गुन्हेगारी रोखण्याचेही मोठे आव्हान शिंदे यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे आता शहरवासीयांचे याकडे लक्ष लागले आहे.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात