सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर नगरपरिषद प्रभाग आरक्षण जाहीर..


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर नगर परिषद प्रभाग आरक्षण  उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव व मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी प्रभागाचे आरक्षण जाहीर केले 
     काही दिग्गजांची उघडली लॉटरी तर काही दिग्गजांचे स्वप्नभंग परतूर नगर परिषदेच्या अकरा प्रभागांच्या जागेसाठी आज 13 जून सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली.  अनेकांची लॉटरी लागली .जाहीर झालेली प्रभाग निहाय आरक्षण सोडत कशी.
जागा प्रभाग क्रमांक 1 अ, मध्ये अनुसूचित जाती महिला व ब, मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 अ ,मध्ये  अनुसूचित जमाती 2 ब, मध्ये सर्वसाधारण (महिला) प्रभाग क्रमांक 3 अ, सर्वसाधारण (महिला) प्रभाग क्रमांक 3 ब, सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 4 अ, मध्ये सर्वसाधारण (महिला) 4 ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 5 अ; मध्ये सर्वसाधारण (महिला) 5 ब मध्ये सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 6 अ, मध्ये सर्वसाधारण (महिला) 6 ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 7 अ ,मध्ये  सर्वसाधारण (महिला) 7 ब ,सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 8 अ, मध्ये  सर्वसाधारण (महिला) 8 ब, सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 9 अ, मध्ये सर्वसाधारण (महिला) 9ब मध्ये सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 10 अ, मध्ये सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण महिला 10ब ,सर्वसाधारण (महिला) 10 क मध्ये सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 11 अ, मध्ये अनुसूचित जाती 11 ब, मध्ये सर्वसाधारण (महिला) अशा प्रकारे परतूर नगरपरिषदेची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत