पॅसेंजर तसेच लोकल रेल्वे गाड्यांचे ग्रामीण स्टेशनचे थांबे पूर्ववत करा.....लालबावटा

परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे
कोरोणाच्या नंतर नांदेड विभागातील पूर्ववत चालू असलेल्या रेल्वेगाड्या काही बंद तर काहींना एक्सप्रेस केले आहे त्यामुळे ग्रामीण स्टेशन वरील थांबे बंद झाले आहेत तसेच गाड्या एक्सप्रेस केल्यामुळे त्यांचे तिकिटाचे दर वाढले आहेत त्यामुळे सामान्य प्रवाशांना जालना औरंगाबाद कडे किंवा परभणीकडे जावयाचे असल्यास त्यांना परतुर किंवा सेलू सारख्या स्टेशन कडे खाजगी वाहनाने यावे लागते मगच प्रवास करता येतो त्यामुळे सामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे कोरोणाच्या महामारी नंतर रेल्वे विभागाने जनतेला सेवा देणे अपेक्षित होते परंतु रेल्वेने या गाड्यांचे थांबे बंद करून व तिकीट दरात वाढ करून त्यांच्यावर अन्यायच केला आहे तसेच ग्रामीण गरीब जनतेला रीझर्वेशन करता येत नसल्यामुळे त्यांना अत्यंत मानसिक त्रास होत आहे. हैदराबाद- औरंगाबाद, निजामाबाद-पुणे,मन माड-काचिगुडा या पॅसेंजर गाड्या पूर्ववत करून सातोना खुर्द, उस्मानपुर, पारडगाव, कोडी,सारवाडी, येथे थांबा देऊन ग्रामीण विद्यार्थी शेतकरी, शेतमजूर,कामगार यांना सहकार्य करावे गंभीर आजार, गरोदर महिला, लहान मुले असलेल्या महिलांना मोफत सुविधा सुरू कराव्यात, विद्यार्थी व वृद्ध यांना प्रवास मोफत करावा, रेल्वे मधील रोजगाराचे कंत्राटीकरण बंद करावे, रेल्वे मधील कंत्राटी कामगारांना कायम करावे अशा विविध मागण्याचे निवेदन लाल बावटा चे महाराष्ट्र अध्यक्ष कॉम्रेड मारुती खंदारे व जालना जिल्हा अध्यक्षा सरिता खंदारे यांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रवाशांच्या व मजूरांच्या उपस्थितीत सातोना खुर्द रेल्वे स्टेशनचे स्टेशन अधीक्षक कौशल कुमार यादव यांना देण्यात आले या निवेदनावर कॉम्रेड रवी भदर्गे, भगवान काळे, स.अमेर, शेख अफ्रिज, सीता अकात, रामा वाव्हळ, मनीषा वाव्हळ यांच्या सह्या आहेत यावेळी रेल्वेचा व परतूर पोलिस स्टेशनचा प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त उपस्थित होता या बंदोबस्तासाठी जालनाचे रेल्वे इंस्पेक्टर नरनाराम,यम् राजमल्लू,राजेश उबाळे, रेल्वे गुप्तचर विभागाचे शेख अजीज अहेमद, साहेबराव कांबळे, दिलीप लोणारे विजय बोराडे, राहुल गायकवाड,कैलास वाघ, सोनाली मुंडे,पांडुरंग चव्हाण तसेच महाराष्ट्र पोलीस दलाचे एपीआय सचिन पुंडगे,नितीन कोकणे, संजय वैद्य,आबासाहेब बनसोडे व महिला पोलिस कॉन्स्टेबल संगीतम आणि उपस्थित होते

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी