केंद्र सरकारला ८ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल युवा मोर्चाच्या वतीने परतूर येथे विकास तीर्थ बाईक रॅलीचे आयोजन-विकास तीर्थ बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा- युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकासकामे घरा घरा पर्यंत पोहचवण्याचे काम युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी करावे-प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर


परतूर प्रतिनिधी हनुमंत दंवडे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आठ वर्ष पूर्ण झाले असून या आठ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये भारत देशाला यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचवल्या बरोबरच जागतिक पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे यानिमित्ताने महाराष्ट्र भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या सूचनेवरून युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या उपस्थितीत दिनांक 15 जून 2022 रोजी सकाळी अकरा वाजता परतूर येथे विकास तीर्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी दिली
ते परतुर येथे संपन्न झालेल्या बाईक रॅली संदर्भात आयोजित पूर्व नियोजन बैठकीत बोलत होते
पुढे बोलताना प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये देशभरामध्ये समतोल विकास साधण्याचे काम झाले असून यामध्ये सर्वसामान्य दीनदलित दुबळ्यांना आधार देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झाले आहे जनधन योजना, उज्वला गॅस योजना, मोफत लस पुरवठा गरीब कल्याण योजना अंतर्गत 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य , कोविड काळामध्ये उत्तम रीतीने परिस्थिती हाताळत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे असेल राष्ट्रीय महामार्गाची बांधणी असेल अशा अनेक गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आठ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये केले असल्याचे सांगतानाच राहुल लोणीकर म्हणाले की केंद्र सरकारच्या माध्यमातून जालना जिल्ह्यासह परतूर विधानसभा मतदार संघाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून विकसित जिल्हा विकसित महाराष्ट्र विकसित देश या संकल्पनेला चालना मिळाली आहे
या पार्श्वभूमीवर विकास तीर्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून परतूर येथील साईबाबा मंदिरापासून या रॅलीची सुरुवात करण्यात येणार असून ही रॅली शिवाजी नगर मार्गे बालाजी गल्ली मोंढा परिसर जय भवानी कॉलनी मार्गे पोलीस स्टेशन चौक गाव मार्गे नारायण दादा चौक ते पोलीस स्टेशन चौक मार्गे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानीया बाईक रॅली चा समारोप करण्यात येणार आहे तर दिनांक 17 रोजी सकाळी 11 वाजता सातोना खुर्द तालुका परतुर दुपारी 01:00 वाजता आष्टी तालुका परतुर येथे तर मंठा शहरामध्ये दिनांक 17 जून रोजी सकाळी 11 वाजता त्याचबरोबर नेर शेवली सर्कलमध्ये दुपारी 01:00 वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीच्या माध्यमातून जिल्हा भरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने राबवलेल्या जनसामान्यांसाठी च्या योजना सर्वसामान्यांच्या घराघरापर्यंत युवा मोर्चा पोहोचणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे
 बाईक रॅलीसाठी मोठ्या संख्येने युवा कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन युवा मोर्चा च्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान 15 16 17 दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये विकास तीर्थ बाईक रॅली आयोजन करण्यात आले असल्याचे युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी यावेळी सांगितले युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजित जोगस भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर भाजपा जालना तालुका अध्यक्ष प्रकाश टकले रामेश्वर नागपुरे दिगंबर मुजमुले प्रसाद बोराडे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संपत टकले युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे विक्रम उफाड, अविनाश राठोड जिल्हा युवती संयोजिका अश्विनी आंधळे सिद्धेश्वर सोळंके, रवी सोळंके बंडू मानवतकर, विलास घोडके अशोक राठोड नितिन सरकटे, सुधाकर सातोनकर नगरसेवक संदीप बाहेकार, प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे यांच्यासह मोठ्या संख्येने युवा मोर्चा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड