न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

अन्सारी इफत फातेमाचे बारावीच्या परीक्षेत यश



परतूर/प्रतिनिधी हनुमंत दंवडे

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते कुणीही घेतले तर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणतात. यामुळे आता अनेकजण शिक्षणावर भर देतात. आपण नाही शिकलो तर आपली मुलं शिकायला पाहिजे, अशीही धारण आता ग्रामीण भागासह शहरी भागात सुद्धा रुजू लागली आहे. त्यामुळे शिक्षण किती महत्वाचे आहे, हे लक्षात येत. हेच महत्व लक्षात घेत शहरातील वृत्तपत्र घरोघरी वाटप करणारे रईस अन्सारी यांची मुलगी अन्सारी इफत फातेमा हिने बारावीच्या प्रथमश्रेणीत येत 86.00 टक्के मार्क घेऊन यश मिळवले आहे
या यशाबद्दल इफत फातेमा हिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत