प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना परतुरयांच्या वतीने सामाजिक वनी करण विभाग कार्यालय परतुर यांना निवेदन सादर.
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
प्रहार क्रांती आंदोलन संघटना प्रतुर यांच्या वतीने सामाजिक वनीकरण विभाग परतूर यांना निवेदन देण्यात आले .दिलेल्या निवेदनामध्ये
सामाजिक वनीकरण कार्यालय मार्फत सन 2019 ते 2022 पर्यतची शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध योजने अंतर्गत तीन वर्षात परतुर तालुक्यातील एकूण बजेट किती शेतकऱ्यांना मंजूर झालेले आहे व किती फाईल मंजूर करण्यात आलेल्या आहेत यांची सविस्तर माहिती देण्यात यावी.
परतूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सामाजिक वनीकरण कार्यालयामार्फत बांधावरील झाडे लावणे ही महाराष्ट्र शासना मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेची शेतकऱ्यांच्या मजुरांची यादी व शेतकऱ्यांची कागदपत्राची वरिष्ठांकडून चौकशी करण्यात यावी .व सण 2019 ते 2022 पर्यंतच्या शासनाचे बजेट कोण कोणत्या स्वरूपात वाटण्यात आले. त्याची माहिती लेखी स्वरूपात शासन नियमाप्रमाणे माहिती देण्यात यावी.
2019 ते 2022 पर्यंतचे रोडच्या साईडने झाडे लावण्यात आले व झाडा साठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्या यासाठी एकूण किती बजेट खर्च करण्यात आलेले आहे.व कोणत्या साइटवर बजेट वापरण्यात आल्या त्याची सविस्तर शासन नियमा नुसार माहिती देण्यात यावी.असे सादर केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. निवेदना देता वेळी उपस्थित
ज्ञानेश्वर आडे प्रहार दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष परतूर,
माऊली कदम प्रहार दिव्यांग उपाध्यक्ष परतूर
कुंडलिक राठोड शाखाध्यक्ष,
द्वारका गाडे महिला जिल्हाध्यक्ष,
भानुदास आडे प्रहार सेवक, आदी ची उपस्थिती या वेळी होती.