स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावी निकालात यश


मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
दि.०९ माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च / एप्रील २०२२ -स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मंठा जि.जालना येथील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२२ चा एकूण निकाल ९ ४.८६ टक्के एवढा लागला असून , कला शाखेतील २ ९ ५ विद्यार्थ्यांपैकी २६६ विद्यार्थी पास झाले आहेत . एकूण निकाल ९ ०.१६ असून त्यापैकी ०६ विद्यार्थ्यांनी विषेश प्राविण्य मिळवले आहे .      या शाखेतून कु . मुक्ता विष्णू मिंड हिने ८४.१६ टक्के गुण घेउन प्रथम क्रमांक मिळवला तर संजय बरसाले ८१.३३ टक्के दुसरा व निकीता उत्तम गोरे हीने ८०.८३ टक्के गूण घेउन तृतीय क्रमांक मिळवला . ५ विज्ञान शाखेतून २४८ विद्यार्थ्यापैकी २४६ विद्यार्थी पास झाले एकूण निकाल ९९.९९ टक्के असून त्यापैकी ३८ विद्यार्थ्यांनी विषेश प्राविण्य मिळवले आहे . या शाखेतून कु . गौरी प्रशांत देव हिने ८६.०० टक्के घेउन प्रथम क्रमांक तर धनजंय विलास खरात याने ८२.६६ टक्के घेउन द्वितीय तर शिवाणी दशरथ निर्मल हिने ८२ . ३३ गुण घेउन तृतीय क्रमांक मिळवला . वाणिज्य शाखेतून ६३ विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल ९ ५.२३ टक्के लागला असून ०१ विद्यार्थी विषेश प्राविण्य घेउन पास झाला या शाखेतून कु.गायत्री विट्ठल ताठे हिने ७ ९ .१६ टक्के गुण घेउन प्रथम तर सुवर्णा रमेश खूळे हिने ७०.१६ व वनिता अशोक घाटोळे हिने ६७.६६ गेण घेउन तृतीय क्रमांक मिळवला . सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ , परतुर च्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकात , उपाध्यक्ष कुनाल आकात , सचिव कपील आकात , प्राचार्य डॉ . सुधाकर जाधव उपप्राचार्य प्रा . संभाजी तिडके , डॉ . सदाशिव कमळकर डॉ.बापू सरवदे व यांच्या सह सर्व शिक्षक वृदांनी केले .

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती