परतूर येथील दिंडी सेवा मंडळाच्या वतीने माऊलींच्या पालखीत 10000 अल्पोपहार पाकीटे व फळाचे वाटप
श्री माऊलीची पालखी फलटण च्या जवळ जवळ येत असताना परतूर च्या दिंडी सेवा मंडळाच्या वतीने अल्पोपहार पाकीट ,केळी व फळ वाटप करण्यात आले दिंडी सेवा मंडळाने प्रथम वर्षातच दहा हजार वारकऱ्यांची सेवा करण्याचा योग आला
सलग दोन दिवस श्री विठ्ठल मंदिर परतूर इथे आल्पोपहार चे पाकीट सर्वांनी एकत्र येत तयार करून गुरुवार रोजी मुक्कामाला जाऊन शुक्रवारी सकाळी प्रसादाचे वाटप करण्यात आले हा उपक्रम दिंडी सेवा मंडळ परतुर दरवर्षी राबवणार आहे पुढील वर्षी सर्व जण एकत्र येत 50000 पाकीट तयार करण्याचा संकल्प केला आहे परंतु शहरातील सर्व अन्नदात्या ना आव्हान आहे की पुढील वर्षी आम्हाला सहकार्य करावे असे मनोगत दिंडी सेवा मंडळाचे सर्वेसर्वा प्रकाश चव्हाण यांनी केले आहे या सर्व कार्याला हातभार व पंढरपूर येथे सेवा देण्याकरिता राजेश म्हस्के प्रमोद राठोड अमोल पैठणकर प्रवीण सातोनकर शामसुंदर चितोडा राजेश अग्रवाल आतुल वाघ राजेश भुजबळ शहाजी राक्षे रमेश भापकर राजेंद्र मुदंडा कृष्णा आरगडे सोनू अग्रवाल किशोर कद्रे विकास बोडके विजय यादव राहुल कदम श्याम जईद आनंद काळे विनोद जईद अंकुश जईद प्रदीप हरणे ओमकार बेंद्रे आकाश खालापुरे महेश पोरवाल अंकुश व परतूर येथे सेवा देण्याकरिता शिवा बल्लम खाणे शिवा स्वामी कैलास चव्हाण भास्करराव काळे विलास चव्हाण श्रीपाद तराशे नामदेवराव वायाळ गणेश कानडे दीपक मोरे वरील सर्व जण उपस्थित होते गुरुवारी सकाळी सहा वाजता विठ्ठल मंदिर इथे श्री विठ्ठलाची आरती करून गाडी फलटण पंढरपूर कडे रवाना झाली
फलटन येथे दोन दिवस थांबून वारकरी भक्तांना आल्पोपहारा चे वाटप केले