सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

माजी मंत्री आमदार लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश.,परतुर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेला 2 कोटी 34 लाख रुपये. निधी मंजुर,संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाथ्यांनी मानले आ.लोणीकर यांचे आभार

प्रतिनीधी हनुमंत दवंडे 
परतुर तालुक्यातील संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना गेली एप्रिल .मे .जून . महिन्यापासून निधी उपलब्ध नव्हता. माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी या विषयाची तात्काळ दखल घेत परतूर तालुक्यातील संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करत परतुर तालुक्यासाठी दोन कोटी 34 लाख रुपये उपलब्ध करून दिल्या मुळे परतुर तालुक्यातील स.गा. योजनेच्या 7 हजार 800 लाभार्थ्यांना आता एप्रिल मे आणि जून या तीन महिन्याचे रखडलेले मानधन मिळण्यासाठी मार्ग सुकर झाला आहे.असे आ.लोणीकर यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे..!
पुढे या पत्रकात आ.लोणीकर यांनी म्हटले आहे कि सध्या परतुर तालुक्यामध्ये संजय गांधी योजनेचे १८६६ लाभार्थी. श्रावण बाळ अ.व ब. चे 5936 लाभार्थी. राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेची 2852 लाभार्थी. इंदिरा गांधी.अपंग योजना 131 इंदिरा गांधी योजना विधवा 234 . संजय गांधी योजना एस. सी .43. संजय गांधी योजना एस.टी . 5 श्रावण बाळ एस .सी. 41 श्रावण बाळ एस.टी.8.संजय गांधी योजना एस सी च्या लाभार्थ्यांना एप्रिल व मे या दोन महिन्याचे मानधन देण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. परतुर तालुक्यातील या लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी माजी आमदार बबनराव लोणीकर व राहुलभैया लोणीकर यांचे आभार मानले..!

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत