डॉ कुणाल सकलेचा एमबीबीएस वैद्यकीय पदवी पास
परतूर प्रतीनिधी हनुमंत दंवडे
येथील केमिस्ट संघटनेचे तालुकाध्यक्ष निहित सकलेचा यांचे लहान बंधु डॉ कुणाल गौतम सकलेचा यांनी नुकतीच एमबीबीएस वैद्यकीय पदवी संपादन करून पास होत यश मिळविले आहे.
डॉ कुणाल सकलेचा यांनी शंकरराव चव्हाण शासकीय मेडिकल विद्यालय नांदेड येथे एमबीबीएस वैद्यकीय शिक्षनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मुलगा कुणाल हा डॉक्टर व्हावा. असे त्यांच्या आईचे स्वप्न बागळत असतांना डॉ. कुणाल यांच्या आईचे एमबीबीएसचा निकाल लागण्याच्या तीन दिवसा अगोदर निधन झाले. मात्र आईचे स्वप्न पूर्ण केल्याने तो आनंद आईला मिळाला नसल्याची खंत डॉ कुणाल यांनी व्यक्त केली.*