साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त मंठा येथे अभिवादन..!


 मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
       येथे (ता.१८) सर्व समाज बांधवांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांनी शाळेत न जाता बिनभिंतीच्या शाळेतच शिक्षण घेऊन त्यांनी ३५ कांदिबऱ्या,१९ कथासंग्रह,१३ लोकनाट्य, १० पोवाडे, १ नाटक, १ प्रवासवर्णन अशी ७० पुस्तकांच्यावर साहित्य लिहून त्यांचे काही साहित्य अनेक भाषेत भाषांतरीत झाले आहे. अण्णाभाऊ हे, सुरुवातीला कम्युनिस्ट विचारसरणीचे होते नंतर त्यांनी आंबेडकरी विचारधारा अंगिकारली. 
त्यांच्या वारणेचा वाघ, वैजंता, फकिरा, आवडी, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, अलगुज,चित्रा या कादंबऱ्यावर चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. १६ जुलै १९६९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंठा येथे अभिवादन करण्यात आले यावेळी जेष्ठ साहित्यिक डॉ. धोंडोपंत मानवतकर, डॉ.प्रतापसिंह चाटसे, अरामकिसन कांबळे, नगरसेवक राजेश खंदारे, अरुणभाऊ वाघमारे, बाळासाहेब वांजोळकर,ॲड सिद्धार्थ अवसरमोल, प्रकाश घुले, शरदभाऊ मोरे, मारुती खनपटे, राज खनपटे, पिराजी पवळे, जय खंदारे, भीमराव वाघ, विलास बनसोडे, नंदू खनपटे, अजय गायकवाड, सोपान वाघ, लखन कांबळे यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी