मंठा पोलीसाची उत्कृष्ट कामगिरी जालना जिल्ह्यात सर्वात जास्त अवैध धंद्या विरुद्ध मंठा पोलीसाची कार्यवाही,..जालना जिल्ह्यात मानांकन मध्ये मंठा पोलीस स्टेशन प्रथम क्रमांकावर. , निरीक्षक संजय देशमुख यांचा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित..
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
दि.१७ मंठा पोलीस ठाणे कडून अवैध दारू विक्रेते विरुद्ध ५७ गुन्हे दाखल करून ५८ करून सहा लाख वीस हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त तसेच जुगार मटका चालकाविरुद्ध १३ गुन्हे दाखल करून ३६ आरोपींना अटक करून २१ हजार ७४० चा मुद्देमाल जप्त केला आहे.मंठा पोलीस स्टेशन येथे मागील संपूर्ण वर्षांमध्ये अवैध दारू विक्रेत्या विरुद्ध सन २०२१ मध्ये एकूण ४६ गुन्हे नोंदविलेले होते.सन २०२२ मध्ये १५ जुलै २०२२ पर्यंत पोलीस ठाणे मंठा हद्दीत एकूण अवैध दारू विक्रेत्यावर ५७ गुन्हे दाखल केले,असून एकूण ५८ आरोपींना अटक केली आहे.त्यांच्याकडून सहा लाख विस हजार तिनसे साठ रुपयाची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे.तसेच मंठा पोलीस हादी मध्ये मटका जुगार खेळणाऱ्या विरुद्ध चालू वर्षात एकूण १३ गुन्हे दाखल केले असून एकूण ३६ आरोपींना अटक केली आहे.त्यांच्याकडून २१,७४० रुपयाची रक्कम व मुद्देमाल जप्त केला आहे.अशा प्रकारे अवैध धंद्याविरुद्धची कठोर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.श्री अक्षय शिंदे,अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे,पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत,पोलीस उपनिरीक्षक दिपाली शिंदे,ए.एस.आय केसव चव्हाण,सोपान चव्हाण,पो.हे.कॉ.दिपक ढवळे,शंकर राजाळे,विठ्ठल मेखले,राठोड पो.आमलदार श्याम गायके,दीपक आडे,प्रशांत काळे,राजु राठोड,सुनील इलग,विशाल खेडकर,बाबा आमटे,अनंद ढवळे, पांडुरंगडुरंग हगवणे,विलास कातकडे,आसाराम मदने,बनकर,आकास राऊत,सविता फुलमाळी,ए.एस.आय नारायण आढे,पो.कॉ.खरात यांनी केली आहे.
तरी सर्व नागरिकांना याद्वारे करण्यात येत आहे की, ज्यांच्याजवळ अशा प्रकारचे अवैध धंदे,दारू विक्री,जुगार खेळणाऱ्या संदर्भात माहिती असल्यास त्यांनी पोलीस स्टेशनला कळवावे त्यांची नावे गुप्त ठेवून सदर दारू विक्री व जूगार खेळणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.तसेच शाळकरी मुला-मुलींना कुणी त्रास देत असल्यास मुलांनी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा किंवा ११२ नंबर माहिती द्यावी असे आवाहन पोलीस ठाणे मंठा कडून करण्यात येत आहे. तसेच ८४५९६ १०४९६,९८२३० ९७१४६,९३२६७ ०४५७७,९९२३० ८११५२ या व्हाट्सअप क्रमांक वर माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव व नंबर गुप्त ठेवण्यात येतील. आहे आवाहन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी नागरिकांना केले आहे.