शिक्षकी पेशेत निष्ठने काम करा- रमाकांत बरीदे परतूर सेवानिवृतीनिमित्त सत्कार


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
     ता.३१(बातमीदार) शिक्षकी पेशात निष्ठतेने काम केल्यास चांगलेच फळ मिळते असे उदगार रविवार (ता. ३१) रोजी जिल्हा परिषद शाळेतून सेवा निवृत्त झालेले शिक्षक रमाकांत बरीदे यांनी आयोजित सेवा गौरव कार्यक्रमात केले. 
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रमोद कुमावत हे उपस्थित होते. या वेळेस पुढे बोलताना सेवानिवृत्त शिक्षक रमाकांत बरीदे म्हणाले की, मी माझ्या 30 वर्षाच्या नोकरीत खडू व फळा यात कधीच अंतर पडू दिले नाही. नवीन भरती झालेल्या शिक्षकांनी पण ही गोष्ट पाळलीच पाहिजे असे ते म्हणाले यावेळी म्हणाले, दरम्यान यावेळी मा.नगराध्यक्ष विनायक काळे,विजय राखे,राजेश कानपुडे, डॉ.संजय पुरी,लक्ष्मीकांत राऊत आदींनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाला शंकरराव पवार,अंकुश बागल,अंकुश तेलगड,अखिल काजी,आरिफ आली, अँड.जगन्नाथ बागल,विष्णू कदम,विष्णू ढवळे, अशोक माने,लक्ष्मीकांत माने,प्रल्हाद माने,नंदलाल कपाळे, प्रभाकर बागल,सतीश गवळी,चंद्रकांत कपाळे, डॉ.गजानन केशरखाणे, डी. बी. काळे, ईश्वर दडमल,श्री पिंपळे,नितीन गवळी,सोनुभाऊ बरीदे,सुभाष बरीदे,महादेव बरीदे,मुकुंद शेपाल,राम रोहिणकर,रोहित कापळे,पांडुरंग कानपुडे,रामा माने,दीपक उबाळे,महारुद्र स्वामी,सतीश गुजर,शिवलिंग राऊत,दीपक मुजमुले आदी उपस्थित होते. 
                        कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण बागल यांनी केले सूत्रसंचालन श्रीमती लंका सोनवणे यांनी केले तर आभार कृष्णा सोनवणे यांनी मानले
 

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश