पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दंवडे
शहरासह ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासूनचा इतिहास पाहता सण उत्सवाच्या काळात जातीय सलोखा अबाधित राहावा याकरिता परतूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 07 जुलै रोजी संध्याकाळी शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली.
बकरी ईद व पंढरपूर आषाढी हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरा होणार असल्याने शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे नागरिकांनी पालन करावे; तसेच सण उत्सव शांततेत साजरा करावे. या उद्देशाने शहरातील सर्वधर्मीय समुदायाला पोलिस प्रशासनाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक बोलावून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे,पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे,माजी उपनगराध्यक्ष सादेख खतीब,अजीज सौदागर,राहिमोद्दीन कुरेशी,सिद्धार्थ बंड, अंकुशराव तेलगड,अखिल काजी,शामसुंदर चित्तोडा,श्रीरंग जईद,सय्यद जुनेद,अय्युब कुरेशी,मौलाना अखिल,माणिक भाई कुरेशी,मौलाना काजी मुजफ्फर,हाजेफ अब्दुल रहेमान हाजेफ फय्याज,हाफेज जाबिर,गुप्तचर विभागाचे संजय वैद्य, यांच्यासह शहरातील अन्य नागरिक उपस्थित होते.