लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

स्वराज्य पत्रकार संघाच्या जिल्हा सचिवपदी प्रसादराव किसनराव गडधे यांची निवड ..


मंठा : प्रतिनिधी सुभाष वायाळ
तालुक्यातील प्रसाद गडधे [गडधे सर] या नावानी ओळखले जाणारे नेहमी  जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना सुद्धा धारेवर धरत असतात सर्व पत्रकारांमध्ये एकजूट असावी यासाठी ते सतत धडपड करीत असतात त्यांची काम करण्याची जिद्द पाहून स्वराज्य पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष निलेश नाहटा ,राष्ट्रीय सचिव उद्धव फंगाळ राष्ट्रीय उपाध्यक्ष अंकुश राठोड यांच्या सूचनेवरून जालना जिल्हाध्यक्ष जगदीश राठोड यांनी यांची जालना जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
       यावेळी जालना जिल्हा उपाध्यक्ष दिलीप हिवाळे, तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, आशिष मोरे उपाध्यक्ष,शबाब हबीब कुरेशी उपाध्यक्ष,महादेव भगवान बोराडे सचिव,आसाराम बाहेर कोषाध्यक्ष,पठान आयुब खान सहसचिव,सुदाम राठोड मा. उपशिक्षण आधिकारी,मा.रावसु राठोड,माजी समाज कल्याण निरीक्षक, मा. शाळीग्राम राठोड वरिष्ठ लिपिक,मा.बाबाराव गडधे,उच्च श्रेणी मुख्याध्यापक पांगरा येथील सरपंच नवनाथ खरात,उपसरपंच विशाल गडधे इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत