महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था निवडणुकीत सहकार पॅनलचा एकतर्फी दणदणीत विजय
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थे म. जालना च्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थेचे विद्यमान अध्यक्ष दादाराव तुपकर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व 13 उमेदवारांचा भरघोस मतांनी विजयी झाला आहे. निवडणुकीसाठी एकूण 2044 सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात सहकार पॅनल चे सर्व उमेदवार निवडून आले.
उमेदवारांना कंसात दिलेल्या संख्येप्रमाणे मते मिळाली.
1.एकनाथ कदम (1767)
2. शरद खोत (1784)
3 डॉ. जगन्नाथ खंडागळे (1772)
4.भाऊराव चव्हाण(1793)
5. सचिन टेकाळे (1767)
6. दादाराव तुपकर (1873)
7. नितीन भोईटे (1788)
8. त्रिंबक मगर (1788).
9.विठ्ठल काचेवाड (1945)
10. संतोष गुडदे (1901 )
11. किसन मिसाळ( 1910)
12. वर्षा पितळे (1904)
13. मंगला शेलगावकर (1942)
या निवडणुकीत पराभूत सर्व उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या.
सर्व विजय उमेदवारांचे सर्व स्तरातून जोरदार स्वागत करण्यात आले.
एकूण 46 कोटी ठेवी व 36 कोटी कर्जवाटप असलेल्या या पतसंस्थेला येणाऱ्या काळात आणखीन भरभराट करण्याचा संकल्प निवडून आलेल्या सर्व संचालक मंडळांनी केला आहे.