ऐतिहासिक हेमाडपंती हर हर महादेव मंदिर बनले भाविकांचे आकर्षण श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी होते भाविकांची गर्दी
मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
दि.३१ऐतिहासिक हेलावंतीनगरी अर्थात हेलस येथील ऐतिहासिक पुरातन हेमाडपंथी हर हर महादेव मंदिर श्रावण महिन्यानिमित्त भाविकांचे आकर्षण बनले असून श्रावण सोमवार निमित्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतात.
मंठा शहराच्या पूर्वेस जवळच असलेल्या नगरीला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे या गाव व शिवारात 12 मारुती मंदिर जागृत, गणपती मंदिर, दत्तात्रय मंदिर, कालिंका देवी माता मंदिर, हेमावती देवी मंदिर, गोंदेश्वर महादेव मंदिर,पुरातन बारव आहे. हेमाडपंथी राजा मामा- भांजे यांच्या आकर्षक मूर्ती या गावात आहेत श्रावण महिन्यानिमित्त दररोज व विशेष करून श्रावण सोमवारी हर हर महादेव मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात आपल्या इच्छा आकांक्षा व इच्छित कामे पूर्ण करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी अभिषेक, दर्शन, संकल्प आणि भंडाऱ्याचे आयोजन दरवर्षी करतात, हर हर महादेव मंदिराला महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळाचा क दर्जा दिलेला असून ग्रामपंचायत चे सरपंच पांडुरंग खराबे पाटील यांच्या पुढाकाराने मंदिर परिसर व पुरातन बारव जिर्णोद्धार तसेच गावातील विविध विकास कामासाठी गणपती पालखी मार्गासाठी सुमारे तीन कोटी 41 लाख रुपये चा विकास कामाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडे दाखल केला असून तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे या माध्यमातून भव्य सभागृह, स्वच्छालय व स्नानगृह, पार्किंग व्यवस्था, घनच कचरा व्यवस्थापन, हायवे लगत भव्य प्रवेशद्वार, गाव ते मंदिर सिमेंट रोड दोन्ही बाजूस नाल्या व लाईट व्यवस्था, पुरातन बारव जिर्णोद्धार, नदीवरील घाटाचे बांधकाम, गणपती पालखी मिरवणूक मार्ग विविध देव देवतांच्या मंदिरासमोर सभागृहसह विविध कामे प्रस्तावित आहेत नवीन सरकारकडून हा प्रस्ताव निश्चितच मंजूर होईल अशी प्रतिक्रिया सरपंच पांडुरंग खराबे पाटील यांनी दिली हर हर महादेव मंदिर पूर्णतः हेमाडपंती असून या परिसरात सभामंडप, सभागृह कंपाउंड वॉल, पाण्याची टाकी आधी विकास कामे झालेली आहेत या ठिकाणचा बारव पुरातन असून भाविक मुद्दामून बारवाला भेट देत असतात महादेव मंदिर परिसरात भाविक भक्ताकडून वृक्षारोपण करण्यात आले असून त्यामुळे मंदिर परिसर निसर्गरम्य आहे शहरालगत जालना- जिंतूर हायवे पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या हेमाडपंती हर हर महादेव मंदिराची निर्मिती अगदी पुरातन असल्याचे जाणकार सांगतात हेमाडपंत नावाचा राजा हेलावंती नगरी अर्थात हेलस येथून आपल्या राज्याचा कारभार पाहत होता त्यांनीच हे मंदिर उभारले असल्याचे वृद्ध व जाणकार मंडळी सांगतात हे मंदिर सर्वांचे आकर्षण बनले असून श्रावण मासानिमित्त दररोज भाविक त्या ठिकाणी गर्दी करतात.
प्रस्ताव मंजूरी साठी पाठपुरा सुरच
हेलस ऐतिहासिक नगरी येथील हर हर महादेव मंदिराला पर्यटन तळाचा क दर्जा मिळाला असून मंदिर परिसर विकास व जागृत गणपती पालखी मार्ग सह विविध विकास कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडे तीन कोटी 41 लाखाचा विविध कामाचा प्रस्ताव दाखल केला आहे तो मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे नवीन सरकार हा प्रस्ताव निश्चितच मंजूर करेल.
पांडुरंग खराबे पाटील
सरपंच ग्रामपंचायत हेलस