शिवसेनेमुळे मिटला वडारवाडीचा विजेचा प्रश्न सेनेचे उपशहरप्रमुख दीपक हिवाळे यांचा पुढाकार नागरिकांनी व्यक्त केले समाधान


 

 परतूर - प्रतीनीधी हनुमंत दंवडे
 नगरपालिका हद्दीतील वडारवाडी पारडगाव रोड ,नागसेन नगर येथे गेल्या २५ ते ३० वर्षापासून नागरिकांचे वास्तव्य आहे, त्यांची पक्के घरे असून नगर पालिकेत घरांच्या नोंदी आहेत प्स्थापित राजकारण्यांनी निवडणुकी पुरताच येथील नागरीकांचा आता वापर केला आहे.परंतू तेथील नागरी सुविधेवर सपेशल दुर्लक्ष करीत आलेले आहेत. 
       येथे नगर पालिकेने कुठल्याच सुविधा पुरविलेल्या दिसत नाहीत.मागील २५ ते ३० वर्षापासून येथील नागरिकांना पिण्याचे पाणी नाही, थ्री फेज लाईट नाही.थ्री फेज लाईट नसल्यामुळे येथील पाण्याचे बोर शोभेच्या वस्तू झालेल्या आहेत.येथील महिला दोन ते तीन किलो मीटर लांबून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे.व पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शिवसेनेचे उपशहर प्रमुख दीपक हिवाळे यांनी जिल्हा संघटक मोहन अग्रवाल व तालुकाप्रमुख अशोकराव आघाव यांच्या मार्गदर्शना खाली वडारवाडी व नागसेन नगर येथील नागरिकांशी संवाद साधून व एमएसईबीचे दरेकर यांच्या सहकार्याने येथील नागरिकांना १९,७७५२९ (एकोणीस लाख सत्यात्तर हजार पाचशे एकोणतिस) रुपयाचे इस्टीमेट असून यात ३० विद्युत खांब व १०० केवीचे ट्रांसफार्मर शिवसेनेने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर काम एन एस सी योजने अंतर्गत मंजूर झालेले आहे. अगदी काही थोड्या दिवसातच या कामासही सुरुवात होईल असे एमएसईबीचे अभियंता दरेकर यांनी सांगितले. तसेच वडरवाडी पारडगाव रोड व नागसेन नगर येथील नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानून मागील २५ ते ३० वर्षाचा विद्युत लाईटचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड