मंठ्यात सुप्रीम कोर्टाच्‍या निर्णयाचे फटाके वाजवून जल्लोषओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा.


मंठा प्रतिनिधी सुभाष वायळ
 दि.२० आज मंठा शहरात माननीय सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडल्यामुळेच राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील निवडणूकीतील ओबीसींच्‍या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे समस्त ओबीसी बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ.बाबासाहेब पुतळ्या समोर फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. 
      सुप्रीम कोर्टाने आज बाठिंया आयोगाचा अहवाल मान्‍य केला आहे. सुप्रीम कोर्टाच्‍या या निर्णयाचे समस्त ओबीसी बांधवांनी स्वागत केले आहे.
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्‍याचा प्रश्‍न दिर्घकाळ प्रलंबित होता. हा प्रश्न निकाली. या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतिनिधींना महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीच्या प्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळेल. इच्छा असेल तर कोणतेही काम करा त्यात नक्की यश मिळेल हेच आजच्या या निकालातून दिसून येत आहे. 
        राज्यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महापालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतीमध्ये ओबीसी राजकीय आरक्षण लागू झाल्यास महापालिकांमध्ये बाठिंया आयोगानुसार २७ टक्के आरक्षणाप्रमाणे ७ महापालिकांचे महापौर पद ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतिनिधीला मिळेल. राज्यातील २४१ नगरपालिकांपैकी २७ टक्के ओबीसी आरक्षणाप्रमाणे ६६ नगरपालिकांचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होईल. १२८ नगरपंचायतीपैकी ३७ ठिकाणी ओबीसी प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव असेल. नगरपंचायतीमध्ये देखील ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळेल. असेही ओबीसी बांधव पत्रकारांना बोलत होते. यावेळी नगरसेवक विकास सूर्यवंशी,नगरसेवक बाज खाॅ,नगरसेवक एन.डी.दवणे,प्रसादराव गडधे, भिम शक्ती जिल्हाध्यक्ष प्रकाश आण्णा घुले, प्रा.माणिकराव थिटे,बाबासाहेब घनवट,अमरसिंग राठोड, गणेश शहाणे, मा.नगरसेवक संजय गायकवाड,अन्साबाई राठोड, कय्युम कुरेशी,शबाब कुरेशी, महादेव वाघमारे,किरण सुर्यवंशी,अशोक खरात, दिलीप हिवाळे, विजय चव्हाण, आत्माराम राठोड, दिपक गायकवाड, सिताराम माऊली जगदीश राठोड यांच्या सह तर ओबीसी बांधव उपस्थित होते.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती