बकरी ईद व आषाढी एकादशी निमित्त मंठा पोलीस स्टेशन येथे शांतता बैठक संपन्न आषाढी एकादशी व ईद शांततेत साजरे करा - पो.निरीक्षक संजय देशमुख


मंठा - प्रतीनीधी सुभाष वायाळ
   मंठा पोलीस स्टेशन येथे शांतता समीतीची बैठक आयोजीत करण्यात आली होती.
यावेळी बैठकीत बोलतांना पो.निरीक्षक श्री संजयजी देशमुख म्हणाले की येणारे सर्व सण उत्सव, ईद शांत्तेत साजरे करावे आषाडी एकादशी व बकरी ईद/ईदउल अजाह हे एकाच दिवशी येत असल्याने सणासुधीच्या वेळी सामाजिक सलोखा आबादीत राहो व कोणत्याहि समाजाचे अथवा व्याक्तिचे मन अथवा भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी अथवा खबरदारी घ्यावी.फेसबुक,व्हाॅटसॲप,टुवीटर,या सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ अथवा लिखाण असनारी पोस्ट टाकु नये,नसता कायदेशीर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन सर्व धर्मीय समुदायाला संबोधित करतांना श्री देशमुख बोलत होते.व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमाचे सर्वांनी पालन करावे असे ते म्हणाले मंठा शहरामध्ये सर्व सण उत्सव, ईद हे येथील सर्व समाज बांधव हे नेहमी एकञीतपणे मिळुन मिसळुन साजरे करतात हे मंठा शहरवासियांचे खास वैशिष्ट्ये आहे.मंठा शहरामध्ये आजपर्यंत कधीही कोणतेही सण असो अथवा उत्सव, ईद पण कधीच अनुचीत प्रकार घडला नाही आणी कधी घडणारही नाही असे शहरातील बैठकिस उपस्थीत प्रतिष्ठित नागरीक सांगत होते.यावेळी नगराध्यक्ष बालासाहेब बोराडे,उपनगराध्यक्ष जे के कुरैशी,माजी उपनगराध्यक्ष सीराजखान, नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती बाज खान साहब, नगरसेवक अचीत नाना बोराडे, नगरसेवक उबेद बागवान, माजी नगरसेवक मुसाभाई कुरैशी,पञकार यांच्या सह शहरातील प्रतीष्टित नागरिक व पोलीस बांधवांची उपस्थीती होती.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात