2017 व 2018 मध्ये अहिल्याबाई सिंचन विहीर मंजूर करून शासनाची तीन लाख रुपयांची फसवणूक.... परतुर उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर उपोषण


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतुर तालुक्यातील मौजे वलखेड तालुका परतूर या ठिकाणी सिंचन विहिरीचा गट क्रमांक 61 मधील अहिल्याबाई सिंचन विहिरीचा प्रस्ताव सन 2017 व 2018 मध्ये मंजूर करून शासनाची तब्बल तीन लक्ष रुपयाची फसवणूक करून भ्रष्टाचार करण्यात आला आणि या भ्रष्टाचाराची योग्य दिशेने योग्य मार्गाने चौकशी होण्यासाठी गंगाधर विठ्ठलराव सुरुंग यांनी वेळोवेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती परतुर यांना निवेदन देण्यात आले होते.
        पण या निवेदनावरती कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. वरिष्ठाकडे सुद्धा वेळोवेळी त्यांनी निवेदन पाठवले आणि पंचायत समितीने असे सांगितले की या कामाच्या संदर्भामध्ये संचिका ज्या आहेत त्या संचिका आमच्याकडे उपलब्ध नाहीत संचिका पूर्णच्या पूर्ण गहाळ करण्याचे काम येथील अधिकाऱ्यांनी केले होते. याची योग्य चौकशी करून कारवाई करण्याच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा पवित्रा विठ्ठल गंगाधरराव सुरुंग यांनी घेतलेला आहे. जोपर्यंत चुकीच्या पद्धतीने उचललेले विहिरीचे बिल शासनात परत केल्या जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतल्या जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात