परतूर येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत मध्ये 233 प्रकरणे निकाली,तडजोड अंती 80 लाख 55 हजार 20 रुपये इतकी रक्कम जमा
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
तालुका विधी सेवा समिती, परतुर व वकील संघ परतुर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 13/08/2022 रोजी परतूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 233 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून तडजोड अंती 80 लाख 55 हजार 20 रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली.
या लोक अदालतीसाठी एकूण दोन पॅनल ठेवण्यात आले होते. पॅनल प्रमुख म्हणून एल. डी. कोरडे दिवानी न्यायाधीश (क स्तर) परतूर व आर. बी. सूर्यवंशी सहावे सह दिवाणी न्यायाधीश (क स्तर) जालना यांनी काम पाहिले. न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यात पैकी एकूण ९१ प्रकरणात तडजोड होऊन एकूण रुपये ३९,२९,३९०/- इतकी तडजोड रक्कम आणि १४२ दाखल पूर्व प्रकरणात तडजोड होऊन रक्कम ४१,२५,६३०/- अशी एकूण 80 लाख 55 हजार 20 रुपये रकमेची वसुली झाली. लोक अदालतीस पंच म्हणून विधिज्ञ श्री एस. जी. देशपांडे व विधिज्ञ श्री एम.आर. सोळुंके यांनी काम पाहिले.
सदरील लोक अदालत यशस्वी करण्यासाठी श्री. एल. डी.कोरडे दिवानी न्यायाधीश (क स्तर), परतूर श्री. ए.जी. चव्हाण, अध्यक्ष, वकील संघ परतुर, विधीज्ञ श्री. आर.एल. लिंबूरकर श्री. आर.बी. अंभोरे ,श्री. आर. एन. पाईकराव, श्री. डी. एम. डहाले, श्री.एस. बी. वैद्य ,श्री.आर. देशपांडे, श्री झेड. एन.कादरी, श्री.बी. पी. डोल्हारकर, श्री. के. एस. मगर, श्री. व्ही. जी. पाटील ,श्री . एस.जी. देशमुख, श्री. व्ही. जी. कुलकर्णी,श्री.पी. पी .राखे, श्री. एम.पी. वेडेकर, श्री. टी. व्ही. मगर,श्री.एम. एन. काजी, श्री. के. एस.मगर, श्री. एस. पी.राऊत, श्री. ओ. एस. राऊत, श्री. एन. एम. मस्के, श्री .एन .एन. आडे, सौ. डी. एस. पुरी, कुमारी पी. ए. देशपांडे, व इतर विधिज्ञ मंडळी, विशेष सहाय्यक सहकारी अभियोक्ता, कोर्ट कर्मचारी ,बँकांचे, नगर परिषदेचे, पंचायत समितीचे गव अधिकारी, ग्रामसेवक तसेच पोलीस यांनी परिश्रम घेतले. तसेच सदर लोक अदालत यशस्वी करण्यासाठी पक्षकार मंडळींनी प्रतिसाद दिला.