स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा कार्यक्रम संपन्न


मंठा प्रतीनिधी सुभाष वायाळ
     दि. 11 रोजी स्वामी विवेकानंद महाविद्यालय,मंठा येथे हरघर तिरंगा अंतर्गत पोलीस प्रशासन मंठा व स्वामी विवेकानंद महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राईम ट्रॅफिक रुल व सोशल मीडिया वापराबाबत जनजागृती अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय देशमुख हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर जाधव हे होते.
या कार्यक्रमाला उपस्थित प्रशिक्षणार्थी पी.एस.आय दिपाली शिंदे मॅडम पी.एस.आय राऊत, साहेब पो. कॉ. श्री आढे पी.एस.आय श्री शिंदे साहेब पो. कॉ. प्रशांत काळे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात दीप प्रज्वलानंतर राखी पौर्णिमेनिमित्त झाडाला राखी बांधून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उप.प्राचार्य संभाजी तिडके यांनी केले . या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी पी एस आय दिपाली शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. व विविध संधीची माहिती सांगितली. तसेच पो. कॉ. प्रशांत काळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम व मोबाईल वापर संबंधी विविध गुन्ह्याबद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांना पुढील करिअर साठी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पी एस आय श्री. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना ट्रॅफिक रुल समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक श्री संजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सुधाकर जाधव यांनी बोलताना सांगितले की विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत आणि देशाचे भविष्य घडवण्याचे कार्य आमच्या हाती आहे,याचा आम्हाला अभिमान आहे असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.पाटील मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. संदेश राठोड यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.शेळके सर प्रा. सौ.देशमुख मॅडम प्रा. आर के शिंदे प्रा. पंढरीनाथ काकडे यांनी सहकार्य केले.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती