देशभक्तीची भावना वाढीस लागावे यासाठी लोकसहभागातून हरघर तिरंगा संकल्प पूर्ण व्हावा - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे , नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक राष्ट्रभिमानी व्यक्तीच्या घरावर नक्कीच तिरंगा फडकेल - लोणीकर,देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या माजी सैनिकांसह, समाजसेवी, लोकतंत्र सेनानींचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोणीकरांच्या हस्ते सत्कार,परतूर येथे "हर घर तिरंगा रॅली" अभूतपूर्व रॅली; विद्यार्थी, शासकीय कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा उदंड प्रतिसाद


परतुर प्रतिनिधी हनुमंत दंवडे
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून हे वर्ष साजरे करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी तिरंगा फडकवण्याचे अभिमानास्पद कार्य हाती घेतले असून प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीच्या घरावर तिरंगा ध्वज नक्की फडकलेला दिसेल असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज परतुर येथे केले
परतुर येथे आयोजित हरघर तिरंगा रॅली च्या समारोप प्रसंगी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव तहसीलदार रूपाची चित्रक भाजपा परतुर तालुका अध्यक्ष रमेशराव भापकर नगरपालिका मुख्याधिकारी सुधीर गवळी गटविकास अधिकारी आकाश गोकणवार गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे शहराध्यक्ष गणेश पवार भगवानराव मोरे अशोकराव बरकुले दिगंबर मुजमुले रंगनाथ येवले सुधाकर बापू सातोनकर संदीप बाहेकर कृष्णा आरगडे प्रकाश चव्हाण प्रदीप ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्नशील असून सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास हा मूलमंत्र घेऊन प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीने कार्य करावे हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आझादीचा अमृत महोत्सव लोकसहभागाच्या भावनेने साजरा करणे हा या मोहिमेमागील संकल्पना असल्याचे यावेळी लोणीकर यांनी सांगितले आहे.

जगभरातील अधिकाधिक भारतीयांना त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे. या वर्षी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाच्या समर्पणाचे आणि राष्ट्रध्वजाशी संबंधित वैयक्तिक संलग्नतेचे प्रतीक म्हणून हे अभियान कार्य करणार आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक घरात तिरंगा ध्वज फडकवला जाईल. या मोहिमेसाठी प्रत्येक नागरिकाला प्रोत्साहन दिले जाईल. असेही लोणीकर यावेळी म्हणाले

नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाची जाणीव वाढवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतामध्ये राष्ट्रीय ध्वज संहिता काय आहे. त्याच्या वापराचे नियम काय आहेत. यासाठी भारत सरकारने 'फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002' तयार केला आहे. यात राष्ट्रध्वजाचा वापर, प्रदर्शन आणि फडकवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. 26 जानेवारी 2002 रोजी भारतीय ध्वज संहिता लागू झाली. ज्या द्वारे खाजगी सार्वजनिक आणि सरकारी संस्थांद्वारे ध्वज फडकवण्याची नियमावली स्पष्ट करते. असेही लोणीकरांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले

*विद्यार्थ्यांचा हर घर तिरंगा रॅलीमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद*
हर घर तिरंगा जनजागृती रॅलीच्या माध्यमातून आज परतुर शहर तिरंगामय झाले होते परतूर शहरातील सर्व शाळांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते पाच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम सारख्या घोषणा देत रॅलीमध्ये सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परंतु शहरातील वातावरण पूर्णपणे तिरंगामय तथा देशभक्तीने ओतप्रोत झाले होते प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांपासून माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत मुला-मुलींनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता.

*देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या माजी सैनिकांसह, समाजसेवी, लोकतंत्र सेनानींचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोणीकरांच्या हस्ते सत्कार*
देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या माजी सैनिकांसह लोकतंत्र सेनानींचा अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते आज रॅलीच्या समारोपप्रसंगी सत्कार करण्यात आला.यावेळी
तुकाराम उबाळे प्रशांत पुरी प्रशांत राखे प्रकाश हिवाळे दामोदर बालकोन सुनील गिरी बेगाजी सोनटक्के नारायण रोकडे नागनाथ मंत्री विठ्ठल बोराडे सोपान धुमाळ विजय बोराडे या माजी सैनिकांसह प्रकाशराव दीक्षित भगवानराव कवडी आसारामजी धोत्रे सुमनबाई सुधाकर पुरी या आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगणाऱ्या लोकतंत्रसेनानींचा देखील सत्कार लोणीकरांच्या हस्ते करण्यात आला. लायन्स क्लबचे श्री मनोहर खालापुरे यांनी लायन्स क्लब च्या माध्यमातून नऊ हजार पेक्षा अधिक नागरिकांचे नेत्र शस्त्रक्रिया करून गोरगरीब लोकांना नवदृष्टी दिली त्यानिमित्त लोणीकरांच्या हस्ते खालापुरे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी सुधाकर सातोनकर  सरफराज कायमखानी प्रमोद राठोड कल्याण बागल श्यामसुंदर चितोडा प्रकाश चव्हाण संदिप बाहेकर प्रवीण सातोनकर कृष्णा आरगडे अमर बगडिया बंडू मानवतकर प्रकाशराव दीक्षित दया काटे शिवाजी पाईकराव मुज्जू कायमखानी मलिक कुरेशी राजेंद्र मुंदडा ओम मोर खय्युम पठाण अर्जुन पाडेवार यांच्यासह परतुर शहरातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....