भाजपा हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,पक्षादेशाप्रमाणे थेट बूथवर जाऊन लोणीकरांनी घेतली बूथ कार्यकर्त्यांची बैठक

प्रतिनिधी सुभाष वायाळ
घराणेशाहीला कोणताही थारा न देता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा देश हा जगातील एकमेव पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडे बघितले जाते काम करणाऱ्या कार्यकर्त्याला केवळ भारतीय जनता पार्टीमध्येच न्याय मिळू शकतो असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले
पक्षादेशाचे पालन करत श्री लोणीकर यांनी आज जालना ग्रामीण तालुक्यातील सेवली सोनदेव पाथरूड उमरी-धारा येथील प्रत्यक्ष बुथ रचनेच्या कामात सहभाग घेतला यावेळी भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजुळ जालना ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रकाश टकले भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष जिजाबाई जाधव पंचायत समिती सदस्य दिलीप पवार अशोक डोके डॉ शरद पालवे यांची प्रमुख उपस्थिती होती

पक्षादेशाप्रमाणे थेट बुधवर जाऊन बुथ रचनेची बैठक आज लोणीकर यांच्या उपस्थितीत पार पडली. संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह सर्व आजी-माजी मंत्री खासदार आमदार या सर्वांनी आपापल्या विधानसभा किंवा लोकसभा क्षेत्रात किंवा आपल्याला दिलेल्या जबाबदारीच्या कार्यक्षेत्रात किमान एक बुथ सक्षम करण्याची जबाबदारी घेतली आहे भारतीय जनता पार्टीचा नेता एखाद्या अत्यंत उच्च पदावर विद्यमान असला तरी तो सर्वप्रथम पक्षाचा कार्यकर्ता आहे ही भावना जोपासण्याचे काम पक्षात करण्यात येते आणि कार्यक्षमता असणाऱ्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला योग्य न्याय देण्याची व आपल्या कार्यगुणांना विकसित करण्याची संधी केवळ भारतीय जनता पार्टीत मिळू शकते अशी धारणा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यामुळेच पक्षादेशाप्रमाणे श्री लोणीकर यांनी देखील आज प्रत्यक्ष बुथवर जाऊन प्रत्यक्ष बुथ रचनेची जबाबदारी पार पाडली

पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह प्रत्येक नेत्याने किमान एका बूथची जबाबदारी घ्यावी अशी सूचना पक्षाने केली असून त्यानुसार प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडत आहे बुथवर काम करणाऱ्या यंत्रणे सोबत झालेल्या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांच्या अडचणी बुथ सक्षम करण्यासाठी कोणत्या बाबी करणे आवश्यक आहे बूथ मधील चांगल्या बाबी कोणत्या किंवा कोणत्या घटकांवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे यासह सर्व समावेशक सर्व जाती धर्मांना आपलंसं करून घेत सर्वाधिक मते कशी मिळवता येतील त्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे याबाबत बूथरचनेदरम्यान लोणीकर यांनी कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली

यावेळी कोमल कुचेरिया समाधान वाघमारे प्रमोद भालेकर दिलीप जोशी शिवराज तळेकर गजानन महाजन गणेश मोरे सौरभ माहुरकर अजीम पटेल मुन्ना पटेल बाबुराव शिंदे बबन सदावर्ते सतीश सदावर्ते गोविंद ढेंबरे महादेव काळे रामेश्वर काकडे दत्ता नरवडे आसाराम खरात माऊली क्षीरसागर प्रभाकर गाढवे भास्कर ढाकणे मदन सोळंके गणेश शेजुळ रामदास ढाकणे सोपान शेजुळ जयंत किनगावकर गजानन किटाळे गोविंद गाडेकर यांच्यासह बुथवरील कार्यकर्ते पक्ष पदाधिकारी बूथ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.