पूज्य रामबिलास जी होलानी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने तीरंगा झेंड्या चे वाटप
परतूर प्रतीनिधी हनुमंत दंवडे
पूज्य रामबिलास जी होलानी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने माननीय पंतप्रधान व केंद्र सरकार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या मोहिमेला हातभार लावण्यासाठी पतसंस्थेच्या वतीने झेंड्याचे वितरण आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत राखे हे होते. या कार्यक्रमात सहभागी लोकांना तिरंगा झेंड्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मिठाईवाटप करण्यात आले. या कार्यक्रमात नवीन मोंढ्यातील व्यापारी, माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य,रामबिलासजी होलाणी पतसंस्थेचे अध्यक्ष दिनेश होलाणी,सर्व संचालक पतसंस्थेचे कर्मचारी पत्रकार व लॉयन्स क्लबचे सदस्य व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी परतु शहरातील सर्व माजी सैनिकांचा पुष्पहार व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन महेश होलाणी यांनी केले .याप्रसंगी मनोहर खालापुरे ,अजय देसाई तुकाराम उबाळे व प्रशांत राखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.