सार्वजनिक दहीहंडी उत्सव समिती अध्यक्षपदी अमित कांबळे यांची निवड.
जालना प्रतिनिधी समाधान खरात
शहरातील जुना जालना भागातील सार्वजनिक दही हंडी उत्सव समिती अध्यक्षपदी अमित कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. येत्या 19 ऑगस्ट रोजी अंबड चौफुली भागात या समिती तर्फे सार्वजनिकरीत्या दही हंडी उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.
या वेळी अंबड चौफुली मित्र मंडळातर्फे नूतन अध्यक्ष अमित कांबळे यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी स्वप्नील हिवराळे, शरद ढाकणे, राम अवघड, मयूर गोफने, स्वप्नील घुले, कमलेश झाडीवाले, आदर्श कांबळे, संकेत खिल्लारे, लक्ष्मण गायकवाड, ऋषी शेंडगे आदींची उपस्थिती होती.