प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे आवाहन,नारीशक्तीचा सन्मान कार्यक्रमांतर्गत महिला स्वयंसहायता बचत गटांना ७ कोटी ७३ लक्ष रुपयांचे कर्ज वाटप, कर्तबगार महिलांचा लोणीकरांच्या हस्ते सन्मान
परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात साजरे करावे त्यासाठी देशाचे महामहीम पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा हे अभियान राबवले जात असून या अभियानांतर्गत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरी तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. जगभरातील अधिकाधिक भारतीयांना त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले
परतुर जि.येथील गजानन मंगल कार्यालयात आयोजित हर घर तिरंगा अभियान तथा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल प्रकल्प संचालक विलास खिल्लारे, भाजपा परतुर तालुकाध्यक्ष रमेश भापकर, जालना ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रकाश टकले, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार रूपा चित्रक, विलास आकात, बद्रीनारायण ढवळे सभापती रंगनाथ येवले उपसभापती रामप्रसाद थोरात युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे सुदाम प्रधान किशोर हनवते दिगंबर मुजमुले शहाजी राक्षे शिवाजी पाईकराव प्रदीप ढवळे रामेश्वर तनपुरे संपत टकले परमेश्वर आकात गटविकास अधिकारी गोकणवार उमेदचे संदीप दाभाडे अशोक बरकुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशाचे महामहीम पंतप्रधान नरेंद्र जी मोदी गृहमंत्री अमित शहा भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात हर घर तिरंगा अभियान राबवले जाणार असून या वर्षी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाच्या समर्पणाचे आणि राष्ट्रध्वजाशी संबंधित वैयक्तिक संलग्नतेचे प्रतीक म्हणून हे अभियान कार्य करणार आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली आहे. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोकसहभागाच्या भावनेने साजरा करणे हा या मोहिमेमागील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या काळात जनतेच्या घरावर, सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक संघटना, इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण करण्याची परवानगी नव्हती, झेंडा देशभक्तीच,अस्मितेच प्रतीक असतो, स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपयी यांनी केलेल्या कायदा "झेंडा अधिनियम २००२" मुळे आज घरा घरात झेंडा वंदन होत आहे. अटलजी च्या सरकार ने भारतीय झेंडा वंदन वरील सर्व निर्बंध २००२ मध्ये हटवले, काँग्रेस सरकारचा 'झेंडा अधिनियम १९५०' च्या कायद्यानुसार ध्वजारोहण हा फक्त शासकीय व प्रशासकीय कार्यलये, शाळा इत्यादी ठिकाणी करण्याची परवानगी होती. 'झेंडा अधिनियम' प्रमाणे २६ जानेवारी २००२ पासून भारतीय ध्वज हा शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था, धार्मिक संघटना, वित्तीय, सामाजिक सर्व प्रकार च्या संस्था, रहिवाशी सोसायट्या, स्वतःच्या घरावर, सार्वजनीक चौकात आता फडकवण्यात येऊ शकतो. देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या प्रत्येक नागरिकाने घरी तिरंगा लावण्यासाठी आणि तो फडकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीम सुरू केली असल्याचे देखील लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले
*नारीशक्ती सन्मान अंतर्गत महिला बचत गटांना ०७ कोटी ७३ लक्ष रु चे कर्जवाटप*
ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना बचत गट मार्फत गृह उद्योग व लघुउद्योग उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत उमेद च्या मार्फत नारीशक्ती सन्मान अंतर्गत परतुर तालुक्यातील महिला बचत गटांना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते सात कोटी तर महिला ग्राम संघटना यांना ७३ लक्ष रुपये कर्ज वितरित करण्यात आले चे कर्ज वाटप करण्यात आले. महिला बचत गटाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्तबगार महिलांचा यावेळी लोणीकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बद्रीनारायण खवणे लक्ष्मणराव टेकाळे महादेव वाघमारे भागवत मानवतकर अण्णासाहेब ढवळे मदनराव तौर जितेंद्र अंभोरे नगरसेवक संदीप बाहेकर कृष्णा आरगडे प्रकाश चव्हाण प्रवीण सातोनकर शामसुंदर चितोडा संतोष हिवाळे मलिक कुरेशी राजू दादा वायाळ रमेश आढाव गणपतराव बाण प्रकाश वाघमारे उद्धव वायाळ विठ्ठल बिडवे राहुल काळे रमेश चव्हाण भगवान आरडे केशव धुमाळ केशव ढवळे सुधाकर बेरगुडे शेख नदीम गुलाब सावंत पद्माकर कवडे रामकिसन राऊत बबलू सातपुते वसंत राजबिंडे सुखदेव राजबिंडे सिद्धेश्वर केकान गणेश सोळंके सूर्यभान कदम विष्णुपंत उगले कृष्णा मोटे भुजंग करपे, सर्जेराव आघाव लक्ष्मण बिल्लारे मुज्जू कायमखानी यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्रशासकीय अधिकारी आशा सेविका अंगणवाडी सेविका बचत गटाच्या महिला राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते