सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

लाॅयन्स कल्बच्या फिजिओथेरपी शिबीराला मोठा प्रतिसाद ना गोळी ना औषध,तज्ञांच्या उपस्थितीत उपचार


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 

लाॅयन्स क्लब आॅफ परतुर व डॉ. राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थान राजस्थान यांच्या वतीने परतुर येथे भव्य फिजीओथेरपी शिबीर सुरू असुन या शिबिराला मोठा प्रतिसाद लाभतांना दिसत आहे
       .या शिबीरामध्ये मणक्याचे आजार, सांध्याचे आजार, संधिवात, मणक्यातील गॅप, हाता पायाला मुंग्या येणे,गुडघे दुखी, खांदा दुखी, शस्त्रक्रिया नंतर व्यायाम लिगामेंट इंजुरी ,पाठ दुखी, मानदुखी टाचदुखी याबाबत तपासणी व न्यूरोथेरपीस्ट डाॅ.विक्रम माशाल, व डाॅ.आर.के.सिंघानिया (एम.डी .एमपीटी) यांच्या सह तज्ज्ञांच्या उपस्थितीत जर्मन टेकनिक ने उपचार व मार्गदर्शन केले जात आहे.यावेळी लाॅयन्स कल्बचे झोनल चेअर पर्सन मनोहर खालापुरे,अध्यक्ष डाॅ.संदीप चव्हाण,माजी अध्यक्ष डाॅ.दत्ताञय नंद,पल्लवीताई वाघमारे,भारत सवने,संजीवनी खालापुरे ,कैलास सोळंके सह आदी उपस्थित होते.हे शिबीर मंगळवार 9 आॅगस्ट पर्यंत लाॅयन्स कल्ब हाॅल,जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाजुला मेन रोड परतूर येथे सुरू राहणार असुन रूग्णांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन लाॅयन्स कल्बच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत