परतूर उपविभागीय कार्यालयावर करवाढ विरोधात वंचितची निदर्शन.
परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे
बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाड़ी व मा.रेखाताई ठाकुर प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाड़ी यांच्या आदेशान्वये तसेच जालना जिल्हा प्रभारी मा.जितेंद्र सिरसाठ व जिल्हाध्यक्ष पुर्व मा.भालचंद्र भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या जीएसटी करवाढ व जीवनआवश्यक वस्तु दरवाढ व महागाई विरोधात वंचित बहुजन आघाड़ी,परतूर कार्यकारिणीच्या वतीने आज उपविभागिय अधिकारी कार्यालया समोर निदर्शन करून निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत परीसर दणाणून सोडला.
यावेळी जिल्हा महासचिव डॉ.किशोर त्रिभुवन, महासचिव शफिक अत्तार, जेष्ठ नेते चोखाजी नाना सौंदर्य, जि.उपाध्यक्ष रोहन वाघमारे,बाबु गोसावी,भिमराव गायकवाड, तालुकाअध्यक्ष रविंद्र भदर्गे शहराध्यक्ष राहुल नाटकर, तालुका महासचिव प्रकाश मस्के, महादेव नाचण, मंठा तालुका अध्यक्ष जाधव,शहर सचिव दिपक हिवाळे, शहर उपाध्यक्ष लिंबाजी कदम शहर सल्लागार अशोक ठोके, शोहब पठाण जमीर भाई, पमु पाईकराव, मनोज वंजारे, आकाश मुंढे तसेच तालुका कार्यकारीणीतील सर्व
पदाधिकारी उपस्थित होते.