आकणी विविध विकास सहकारी सोसायटीवर भाजपाचा ताबा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा उडवला धुव्वा,सर्वच्या सर्व 12 उमेदवारांचे निर्विवाद वर्चस्व

मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
      आकणी विविध विकास सहकारी सोसायटी निवडणूक 2022 चे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले असून अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व बारा उमेदवार निर्विवाद वर्चस्व स्थापित केली आहे.
माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या उमेदवारांनी आकणी विविध विकास सहकारी सोसायटी निवडणूक लढवली होती.या निवडणुकीत प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा ध्रुवा उडवत भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून यासंदर्भामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिस्पर्ध्यांनी प्रतिष्ठेची केली असताना सर्वच्या सर्व बारा जागांवर विरोधकांना आसमान दाखवले भाजपा पुरस्कृत पॅनलचे विजयी उमेदवार खणके त्रिंबक भाऊराव,खणके दशरथ तुकाराम,जाधव गुलाब आमृता,नरोटे त्रिंबक दादाराव,पोले पांडुरंग गोपाळराव,मोरे रतन रामभाऊ,मोरे संपत सोमा,राठोड पांडुरंग रेखा, ,कदम अरुणा बालासाहेब,मोरे सत्यशिला विठ्ठलराव,चव्हाण बाबु वाघु,अंभुरे सखाराम गोविंद यांनी प्रचंड मताधिक्य आणि विजय मिळवल्याबद्दल माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश