सोयंजना येथील परमार्थ आश्रम येथे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते 15 लाख रुपये किंमतीच्या च्या सभा मंडपाच्या कामाचे झाले भूमिपूजन,मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाची आपली जबाबदारी- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर ,राजकारणाच्या माध्यमातून धर्माच्या कार्यासाठी आपण सदैव तत्पर - माजी मंत्री आमदार लोणीकर

परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव तत्पर असून राजकारणाच्या माध्यमातून धर्म कार्यात आपण सदैव पुढाकार घेतला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले
ते सोयंजाना तालुका परतुर येथील परमार्थ आश्रम येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या आमदार फंडातून बांधण्यात येणाऱ्या 15 लक्ष रुपये किमतीच्या सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन व संत गजानन महाराज पुण्यतिथी तसेच ऋषी पंचमी निमित्त आयोजित ह भ प सतीश महाराज जाधव यांच्या हरिकीर्तनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की मागील अडीच वर्षाचा काळ हा खडतर काळ होता या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकारने काहीच केले नाही त्यामुळे विकासाची चाके रुतली होती मात्र राज्यात युतीचे सरकार येतात पुन्हा एकदा विकासकामांनी गती पकडलेली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मतदार संघासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याची जबाबदारी आपली असल्याची यावेळी बोलताना आमदार लोणीकर म्हणाले
पुढे बोलताना ते म्हणाले की मुळात माझा जन्मच वारकरी कुटुंबात झाला असल्यामुळे व माझ्या घरामध्ये धार्मिक वातावरण असल्यामुळे धार्मिक कार्यामध्ये मला सदैव गुंतून राहण्याची प्रेरणा मिळते या बळावरच दैठणा येथील गुरु गंगा भारती महाराज संस्थान असेल कारळा येथील कराळेश्वर मंदिर असेल आष्टी येथील खंडेश्वर मंदिर असेल पाटोदा येथील गणपती देवस्थानातील किंवा मंठा तालुक्यातील नांगरतास निळकंठेश्वर आधी धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खेचत आणत या तीर्थक्षेत्रांचा विकास केला त्याचबरोबर मतदार संघात विकास करताना चार हजार 700 कोटी रुपयांची विकास कामे आपण केली असल्याचे यावेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले
पुढे बोलताना ते म्हणाले की मतदार संघातील 200 पेक्षा अधिक गावातील मंदिरासमोर सभा मंडप बांधून दिली येणाऱ्या काळात विकासाचा रथ असाच पुढे ओढत नेण्यासाठी आपण सज्ज असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे ते म्हणाले की खरे तर वारकरी संप्रदाय हा आपला स्थायीभाव असून मी राजकीय क्षेत्रात आलो नसतो तर निश्चितपणाने धर्म कार्याला वाहून घेत समाज प्रबोधन केले असते आज महाराजांच्या कीर्तना श्रावणांचा योग आला त्यामुळे आपल्याला आनंद असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
यावेळी ह भ प सतीश महाराज जाधव श्रीनिवास महाराज ह भ प पांडुरंग महाराज आनंदे ह भ प बिडवे महाराज ह भ प गणेश महाराज जाधव भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रमेश भापकर बद्रीनारायण ढवळे रमेश आढाव लक्ष्मण टेकाळे शत्रुघन कणसे शिवाजी पाईकराव केशव ढवळे बाळासाहेब ढवळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले